मनसुख हिरेनप्रकरणी गुरुवार राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आणखी दोघांना अटक केल्यानंतर आणखी धागेदोरे उलगडू लागले आहेत. न्यायालयात एनआयएने गुरुवारी माहिती देताना असे सांगितलं होते की, ४ मार्चला मनसुखची आधी हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्याचा मृतदेह मुंब्रा खाडीत फेकण्यात आला. पण एनआयएच्या तपासाच्या आधारे मनसुखची पाण्याबाहेरच हत्या करण्यात आली असेल तर त्याचा डायटम रिपोर्ट कसा काढण्यात आला हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्यामुळे याच संशयाच्या आधारे डायटम रिपोर्ट बनवणारे डॉक्टर आता एनआयएच्या रडारवर आहेत.
पोस्टमार्टम आणि डायटम रिपोर्ट करताना जे जे लोक तिथ उपस्थित होते ते सगळे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. एनआयएने त्या दिशेने तपास सुरू केला आहे. त्यामुळे यात एनआयएकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा:
भाजपा आंदोलन करायला आजही घाबरली नाही आणि उद्याही नाही !
आधी मदत द्या, मगच तिसरी घंटा वाजणार
फडणवीसांच्या घरी ओबीसी नेत्यांची खलबतं
व्हेल माशाची ‘उलटी’ विकणारे तिघे जाळ्यात
नदी, नाले किंवा समुद्रात मृतावस्थेत सापडलेली व्यक्ती पाण्यात पडल्यानंतर मरण पावली की प्राण सोडल्यानंतर पाण्यात टाकली गेली हे शोधण्यासाठी डायटम (DIATOM) चाचणी केली जाते.
पाण्यात बुडून झालेल्या मृत्यूची न्यायवैद्यक चाचणी करणे हे कठीण काम असते. अशा मृत्यूची नेमकी कारणे कोणती हे शोधण्यासाठी काही चाचण्या आहेत. त्यात डायटम चाचणी ही महत्त्वाची मानली जाते. मृत व्यक्तीच्या शरीरात डायटम आहेत का याची पाहणी या चाचणीत केली जाते.
डायटम ही पाण्यातील वनस्पती आहे. अशा परिस्थितीत जिथे मृत शरीर सापडेल तेथे मृत शरीराच्या आत सापडलेल्या पाण्यातील डायटम जुळले तर त्या व्यक्तीचा मृत्यू पाण्यात बुडल्यानंतर झाल्याचे स्पष्ट होते.