डॉक्टरने मुतखड्याची शस्त्रक्रिया करताना मुतखड्याऐवजी किडनी काढल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील एका रुग्णालयात घडली. त्यामुळे रुग्णाचा चार महिन्यानंतर मृत्यू झाला. आता गुजरातच्या ग्राहक विवाद निवारण आयोगाने मृत रुग्णाच्या कुटुंबीयांना ११.२३ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश संबंधित रुग्णालयाला दिले आहेत.
खेडा जिल्ह्यातील वांघ्रोली येथील रहिवासी देवेंद्रभाई रावल यांनी त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल बालसिनोर येथील केएमजी रुग्णालयातील डॉ. शिवूभाई पटेल यांच्याशी संपर्क साधला होता. मे २०२१ मध्ये त्यांच्या किडनीमध्ये मूतखडा असल्याचे निदान झाले होते. त्यांना चांगले उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, त्यांनी त्याच रुग्णालयात शस्त्रक्रिया करून खडा काढण्याची इच्छा दर्शवली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये २०११ मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांच्या चुकीमुळे मुतखड्याऐवजी किडनीच बाहेर काढल्याचे कळताच कुटुंबीयांना धक्का बसला.
हे ही वाचा:
‘बांगलादेशात जे घडले तेच मुंबईत घडणार आहे…’
देवभूमीत पुन्हा ढगफुटीने हाहाःकार
‘शिवतीर्थावरील इटलीचे दिवे हा योगायोग, की लांगुलचालन?’
‘बांगलादेशी हिंदूंचे रक्षण आणि पुनर्वसन करा!’ काँग्रेस नेत्याची मागणी
त्यानंतर रुग्णाला आणखी त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला गेला. त्यांना अहमदाबाद येथील आयकेडीआरसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ८ जानेवारीला २०१२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. देवेंद्र भाईंच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी संबंधित रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली होती. प्रकरण ग्राहक न्यायालयात पोहोचताच न्यायालयाने संबंधित रुग्णालयाला यामध्ये दोषी ठरवले. त्यानंतर संबंधित रुग्णालयाने रुग्णाला ११.२३ लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत.