उच्च न्यायालयाचे आदेश
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात एक तक्रार कलिना येथील महिलेने केली आहे. ही तक्रार ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने यावर योग्य ती चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. संजय राऊत संबंधित महिलेवर नजर ठेवत असून मानसिक छळ करतात अशी तक्रार एका ३६ वर्षीय महिलेने केलेली आहे.
राऊत यांच्याकडून मात्र लावलेले आरोप मात्र फेटाळून लावण्यात आलेले आहेत. हे सर्व आरोप फेटाळून लावत मुंबई हायकोर्टाला सांगण्यात आले की, याचिकाकर्ती ही त्यांना मुलीसारखी आहे. त्यांच्यावर हे आरोप लावण्याचे कारण ते त्या महिलेच्या पतीची बाजू घेत असल्यामुळे हे आरोप लावण्यात आले असे सांगितले गेले.
हे ही वाचा:
प्रदीप शर्मा यांचे फाउंडेशन एनआयएच्या रडारवर
दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक
झाड कापण्यासाठी पालिकेचा सोसायटीच्या खिशावर दरोडा
महिलेने याचिका दाखल केल्यानंतर तिला अदखलपात्र गुन्ह्यासाठी अटक झाली. तसेच तिची पीएच डी डिग्री बनावट असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. ही याचिकाकर्ती गेले १२ दिवस कारागृहात असून, तिने याचिका दाखल केल्यानंतर पोलिसांचा ससेमिरा या महिलेच्या मागे हात धुवून लागला. न्यायालयाने याबाबत अटकेसंदर्भात स्वतंत्र याचिका दाखल करण्यात येईल असे म्हटले. तसेच पोलिस आयुक्तांनी योग्य ती कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. २४ जूनपर्यंत संबंधित प्रकरणाचा अहवाल दाखल करुन घेण्याचेही न्यायालयाने आदेश दिले आहेत.
या प्रकरणासंदर्भात मार्चमध्ये झालेल्या सुनावणीत राऊत यांच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रसाद ढाकेफळकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. सतत आरे ला कारे भाषा करून प्रसिद्धीच्या झोतात राहणारे शिवसेना नेते संजय राऊत आता चांगलेच तोंडावर पडले आहेत. या प्रकरणामुळे संजय राऊत यांची राजकीय गोची झालेली आहे.