मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक महेश मांजरेकर हे त्यांच्या ‘वरण भात लोन्चा कोण नाय कोंचा’ या चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. चित्रपटातील प्रसंग, संवाद आणि भडक चित्रिकरण यामुळे हा चित्रपट वादास कारणीभूत ठरला होता. मात्र, आता न्यायालयाने महेश मांजरेकर यांना दिलासा दिला आहे. पुढील सुनावणी होईपर्यत कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई न करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना न्यायालयाने दिले आहेत.
महेश मांजरेकर यांचा ‘वरणभात लोंचा कोन नाय कोंचा’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्याच्या ट्रेलरवरुन महेश मांजरेकर यांच्यावर टीका करण्यात आली होती. अश्लील संवाद, चित्रिकरण यामुळे महिला आयोगाने देखील याची दखल घेतली होती. यासगळ्या प्रकरणात महेश मांजरेकर यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोस्कोच्या सेक्शन २९२, ३४ तसेच आयटी सेक्शन ६७ आणि ६७ बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
पोलंडच्या राजदूताने केला शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींच्या खोट्याचा पर्दाफाश
अखिलेश यादव की होगी हार, भाजपा करेगी ३०० पार
‘भारतीयांना मायदेशात परत आणण्याची मोहीम काय शिवसेनेने सुरू केली का?’
शार्क टँक इंडिया फेम ‘भारत पे’चे सह- संस्थापक अश्नीर ग्रोव्हर पायऊतार
याप्रकरणी सुनावणी घेणारे नियमित खंडपीठ सध्या कार्यरत नसल्याने यावर न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठापुढे तातडीची सुनावणी झाली. ज्यात याप्रकरणी अटकेची कारवाई करण्यापासून मुंबई पोलिसांना रोखण्यात यावे अशी मागणी मांजरेकर यांच्यावतीने करण्यात आली होती. त्यावर आता महेश मांजरेकर यांना न्यायालयाने दिलासा दिला असून पुढील सुनावणी होईपर्यंत कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई न करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे.