सततच्या रडण्याला कंटाळून मतिमंद व्यक्तीने नातू आणि सुनेची केली हत्या!

उत्तरप्रदेशातील सीतापूरमधील घटना

सततच्या रडण्याला कंटाळून मतिमंद व्यक्तीने नातू आणि सुनेची केली हत्या!

उत्तरप्रदेशातील सीतापूरमधील एक अजब घटना समोर आली आहे.नातू सतत रडतो म्हणून स्वतःच्या नातवाला आणि सुनेला ठार केले आहे.कमलकांत (५५) असे आरोपीचे नाव असून तो मानसिकदृष्ट्या अपंग आहे.पोलिसांनी आरोपी कमलकांत याला अटक केली आहे.सीतापूरचे एसपी चक्रेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या सततच्या रडण्यामुळे अस्वस्थ झालेल्या आरोपी कमलकांतने आयुषवर(नातू) विळ्याने हल्ला केला.

उत्तर प्रदेशातील सीतापूरमधील तळगाव पोलीस स्टेशन क्षेत्रातील मुडियाकालन गावात ही घटना घडली.या घटनेने भागात एकाच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कमलकांत हे आपली पत्नी, नातू आणि सुनेबरोबर मुडियाकालन गावात राहतात तर त्यांचा मुलगा पंजाब येथे कामाला आहे.दरम्यान, आपला नातू सतत रडत असतो म्हणून आरोपीने कंटाळून नातवावर विळ्याने हल्ला केला.

हे ही वाचा:

तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द!

‘वाँटेड’ गुन्हेगारांनी भारतात या आणि कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जा!

पुतिन यांच्याकडून मोदींचे कौतुक; ‘भारताच्या हितरक्षणासाठी मोदी कठोर भूमिका घेतात’

तब्बल अडीच वर्षाने परतली टी-४२ वाघीण!

हल्ल्यादरम्यान आरोपीची सून शिखा हीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिच्यावरही आरोपीने अमानुषपणे हल्ला केला.या हल्ल्यात नातू (आयुष) याचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या शिखाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.जेव्हा ही घटना घडत होती तेव्हा आरोपीची पत्नी हजर न्हवती, ती जेव्हा घरी आली तेव्हा तिने पहिले.त्यांनतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.पोलीस घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

 

Exit mobile version