माहीम मगदूम शहा दर्ग्याच्या मागे असलेल्या समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी आज भाषणात केल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून त्या परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. आता हे बांधकाम लागलीच तोडण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीच तसे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधून केलेल्या भाषणात माहीममधील या अनधिकृत मजारीबद्दल गौप्यस्फोट केला होता. व्हीडिओच्या माध्यमातून हे अनधिकृत बांधकाम कसे फोफावले आहे हे त्यांनी सांगितल्यानंतर पोलिस, पालिका प्रशासन, राज्य सरकार अशा सगळ्यांनीच याची गंभीर दखल घेतली.
हे ही वाचा:
कौतुकास्पद!! स्टार हॉकीपटू राणी रामपाल हिच्या नावाने आता स्टेडियम
गायक सोनू निगम यांच्या वडिलांच्या घरातून लुटले ७२ लाख, वाहन चालकाविरुद्ध गुन्हा
अमृतपाल सिंहचे काय झाले? न्यायालयालाही पडलाय प्रश्न…
जिच्या हाती ‘वंदे भारत’ची दोरी..
राज ठाकरे यांनी भाषणात केलेल्या आरोपानुसार मुंबई पोलिसांनी या जागेची पाहणी करून पडताळणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. ती जागा जिल्हाधिकारी यांच्या प्रांतात येत असल्याची प्राथमिक माहिती असल्याने जिल्हाधिकारी आणि पोलीस दोघांकडून जागा पडताळली जाणार होती. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी हे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात येणार असल्याचे सांगितले.
राज ठाकरे यांनी या भाषणात ड्रोनच्या सहाय्याने या अनधिकृत बांधकामाचे चित्रण केले. भर समुद्रात भराव टाकून एक थडगे तिथे बांधण्यात आल्याचे दिसत होते. या बांधकामाला कुणी परवानगी दिली, कुणाच्या बेजबाबदारपणामुळे हे अनधिकृत बांधकाम उभे राहिले असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता. जर हे बांधकाम हटविण्यात आले नाही तर त्याच्या बाजूला गणपती मंदिर उभारण्याचा दावा राज ठाकरेंनी केला होता. शिवाय, मुस्लिमांना हे अनधिकृत बांधकाम मान्य आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली होती.