28 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरक्राईमनामाठाकरे, शिंदे समर्थक धारावीत भिडले, तीन शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

ठाकरे, शिंदे समर्थक धारावीत भिडले, तीन शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

तीन शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

Google News Follow

Related

एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेले आमदार सदा सरवणकर यांनी गुरुवारी सायंकाळी धारावीत कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर शिवसेना आणि शिंदे गटात हाणामारी झाल्याचं समजतं आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी ही घटना तात्काळ आटोक्यात आणून शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला.

आमदार सदा सरवणकर यांनी २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी धारावीत कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. नवरात्रीमध्ये देवीच्या आगमनासंदर्भात ही बैठक मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सुरू होती. त्याचवेळी शिवसैनिक घटनास्थळी पोहोचले. यावेळी दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली. एकनाथ शिंदेंच्या समर्थकांविरोधात घोषणाबाजी सुरु झाली. शिवसैनिकांकडून जातीवाचक शिवीगाळ करण्यात येत होती. त्याला दुसऱ्या बाजूच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. मात्र, या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली.

हे ही वाचा:

बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी

अमेरिका का म्हणतोय UNSC मध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व द्या?

… आणि पंतप्रधान मोदींनी परभणीच्या चिमुरडीला पाठवलं पत्र

‘ज्यांना दूध पाजले म्हणता त्या शिवसैनिकांचा त्याग, मेहनत आहे पक्षवाढीत’

या अगोदर गणपती विसर्जनानंतर १० सप्टेंबर रोजी सदा सरवणकर आणि ठाकरे गटात प्रभादेवीमध्ये राडा झाला होता. सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना पिस्तूलचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. त्यानंतर सदा सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता

पिस्तूल जप्त

विसर्जनानंतर शिवसेना आणि एकनाथ शिंदे समर्थक भिडले होते. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांचे पिस्तूल जप्त केले होते. या कारणास्तव पोलीस आधीच सतर्क होते, त्यामुळे येथे परिस्थिती बिघडू शकली नाही, मात्र धारावीत अजूनही तणावाचे वातावरण आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा