टूलकिट प्रकरणात दिशा रवीला जामीन

टूलकिट प्रकरणात दिशा रवीला जामीन

टूलकिट प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या दिशा रवी हिला दिल्ली सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी एक लाख रुपयांच्या दोन स्युरिटीज जमा केल्यानंतर दिशाची मुक्तता होईल.

ग्रेट थनबर्ग या कथित पर्यावरणवादी कार्यकर्तीने शेतकरी आंदोलन संबंधी टूलकिट ट्विटरवर अनवधानाने अपलोड करून भारतविरोधी शक्तींचा पर्दाफाश केला. २६ जानेवारीला दिल्ली येथे झालेल्या हिंसाचार आणि टूलकिटच्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दिल्ली पोलिसांच्या तपासात दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू मुळूक या तिघांची नावे समोर आली आहेत. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत दिशा रवी हिला तेरा फेब्रुवारी रोजी अटक केली. निकिता जेकब आणि शंतनू मुळूक यांच्या विरोधात पोलिसांनी अजामीनपात्र कलमे लावली आहेत. निकिता आणि शंतनू ह्या दोघांनाही न्यायालयाचा दिलासा मिळाला असून त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने आणि औरंगाबाद खंडपीठाने ट्रान्झिट स्वरूपाचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

हे ही वाचा:

‘गजा मारणे’ मार्गावर संजय राठोड

शंतनू मुळूकही अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात
एकीकडे दिशा रवीला कोर्टाने जामीन मंजूर केला असतानाच शंतनू मुळूक यानेही जामिनासाठी कोर्टात धाव घेतली आहे. २४ फेब्रुवारी रोजी शंतनू मुळूक ह्याच्या जामिनावर सुनावणी होणार आहे.

Exit mobile version