मुंबई मधील दहिसर परिसरात चोरी करणाऱ्या ३ आरोपींना उत्तर प्रदेश मधील ग्रेटर नोयडा भागातून दहिसर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. सलमान अन्सारी, हैदर अली सैफी आणि खुशाल वर्मा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून १८ लाख ७ हजार किमतीचे सोन्याचे दागिनेही जप्त केले आहेत. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. अशी महिती दहिसर पोलिसांनी दिली.
तसेच पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी वर्षभरापूर्वी दहिसर पूर्व येथील चुनाभट्टी येथील सचिन नगर भागातील एका फ्लॅटमधून ९३३ ग्रॅम व ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार दहिसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या चोरीची माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले. तपसा दरम्यान पोलिसांना १६७ सीसीटीव्ही फुटेज आणि ९७ मोबाईलचे सिमकार्ड तपासल्यानंतर पथकाला चोरट्यांचा सुगावा लागला.
हे ही वाचा :
गोध्रा कटाच्या सूत्रधाराचा जामीन वाढविला
बेस्टमध्ये फुकट्या प्रवाशांचा सुळसुळाट
या’ कारणामुळे ट्विटरच्या ‘ब्लू टिक’ पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय मागे
गजानन कीर्तिकरांचा उद्धव गटाला रामराम, शिंदे गटात सामील
या तांत्रिक माहितीच्या आधारे दहिसर पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे गेले. जिथे चोर राहत होते त्या भागात आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी पोस्टमन आणि पान टपरीवाल्याचे वेशांतर करून या चोरांची विश्वसनीय माहिती गोळा केली. नंतर, उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने, दोन्ही चोर आणि चोरीचे दागिने विकत घेणार्या खुशाल वर्मा नावाच्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली. या आरोपींकडून अन्य चोरीचे गुन्हे केले आहेत का यांचा दहिसर पोलिस तपास घेत आहेत.