32 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरक्राईमनामानशेसाठी वापरण्यात येणाऱ्या द्रव्याने रुमाल पेटवून जाळण्याचा प्रयत्न; मुंब्र्यात घडली घटना

नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या द्रव्याने रुमाल पेटवून जाळण्याचा प्रयत्न; मुंब्र्यात घडली घटना

मूकबधीर युवक भाजला, केईएम रुग्णालयात उपचार सुरू, १२ तास बेडची करावी लागली प्रतीक्षा

Google News Follow

Related

ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री भयंकर घटना घडली. रात्री ११.१५च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली. रात्री एका रेल्वे प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नशेसाठी वापरण्यात येणारे द्रव्य रुमालाला लावून आग लावण्यात आली आणि एका अपंग प्रवाशाच्या अंगावर तो रुमाल फेकण्यात आला. या हल्ल्यात प्रवाशाच्या हाताला, मानेला भाजल्याच्या गंभीर जखमा झाल्या आहेत. या जखमी इसमाचे नाव प्रमोद वाडेकर असून त्याचे वय ३५ आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण रेल्वेत हा हल्ला झाला. या हल्ल्यात वाडेकर यांचा डावा हात प्रचंड होरपळला असून बोटे जखमांमुळे सुजली आहेत तर डाव्या हातापासून मानेपर्यंतची त्वचा सोलवटून निघाली आहे. ज्याने वाडेकर यांच्यावर हल्ला केला ती व्यक्तीही दिव्यांग असल्याचे कळते. वाडेकर हे मूकबधिर आहेत.

हे ही वाचा:

खतरनाक आरोपी अतिकला उत्तर प्रदेशला नेणार; उमेश पाल हत्याकांड

वैभव मांगले म्हणतोय ‘भय इथले संपत नाही!’

अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीची ‘पासिंग आऊट परेड’

इस्रोने रचला इतिहास, एकाचवेळी ३६ उपग्रह आभाळात झेपावले

ही घटना घडल्यानंतर वाडेकर यांना कळव्याच्या छत्रपती रुग्णालयात नेण्यात आले पण तिथे उपचार होणार नाहीत, असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना केईएम रुग्णालयात आणले गेले. तिथेही त्यांना रात्रभर बेड उपलब्ध झाला नाही. तब्बल १२ तास ही जखमी व्यक्ती बेडसाठी तडफडत होती. अखेर सकाळी ११ वाजता त्यांना बेड उपलब्ध झाला. आता केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नशेसाठी वापरणाऱ्या सोल्युशनने हा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ज्या व्यक्तीने हा हल्ला केला ती व्यक्ती मुंब्रा येथेच उतरून पळून गेली आहे. त्या व्यक्तीचा शोध जारी आहे. –

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा