जम्मू काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकांची गळा चिरून हत्या

जम्मू काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे./

जम्मू काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकांची गळा चिरून हत्या

जम्मू काश्मीरमध्ये पोलीस महासंचालकांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवार, ३ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा तुरुंग विभागाच्या पोलीस महासंचालकांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे जम्मू काश्मीरमध्ये खळबळ उडाली आहे. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आता सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक हेमंत लोहिया यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात लोहिया यांच्या मदतनीसावर संशय आहे. या घटनेनंतर तो फरार झाला आहे. हेमंत लोहिया यांच्या शरीरावर चाकूने वार केल्याचं पोलिसांना आढळून आलं आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, लोहिया यांच्या शरीरावर चाकूने वार करण्यात आले आहेत. लोहिया यांच्या पायाला तेल लावल्याचंही आढळून आलं आहे. त्यांचा पाय सुजला होता. आरोपीने लोहिया यांना गुदमरून मारलं, त्यानंतर सॉसच्या बाटलीच्या काचेने त्यांचा गळा चिरला आणि मग त्यांचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

मुंबई विमानतळावरून ९.८ कोटींचे कोकेन जप्त

काँग्रेसच्या पाच नेत्यांना ईडीकडून समन्स

मुस्लिम तरुण नाव बदलून गरब्यात घुसले, तिघांना अटक

टेकूच्या शोधात शिल्लक सेना…

लोहिया यांना ऑगस्ट महिन्यात पोलीस महासंचालक (तुरुंग प्रशासन) ही जबाबदारी देण्यात आली होती. हेमंत लोहिया हे १९९२ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कालच आपल्या तीन दिवसीय जम्मू काश्मीर दौऱ्यावर आले आहेत. त्याच दरम्यान ही घटना घडल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

Exit mobile version