सध्या जागतिक व देश स्तरावर सायबर गुन्हयांचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढत होत आहे. दैनंदीन इंटरनेट व मोबाईलच्या वापरात होणारी वाढ लक्षात घेता सायबर गुन्हयांच्या प्रमाणात देखील मोठया संख्येने वाढत होत आहे. तसेच सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रातील दैनंदिन कामकाजाच्या डिजिटलायझेशन मुळे जगभरात सायबर गुन्हयांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. नवीन तांत्रिक प्रगती आणि सामाजिक गरजांना मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद पाहुन सायबर गुन्हेगार सतत त्यांच्या पद्धती बदलत असतात.
ऑनलाइन नोकरी फसवणूक, ऑनलाइन शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक, फिशिंग, क्रेडिट कार्ड फसवणूक, सेक्सटोर्शन, कर्ज फसवणूक आणि विवाह विषय फसवणूक यासारखे गुन्हे प्रचलित असताना, अलिकडच्या काळात डिजिटल अटक फसवणूक या गुन्हयांच्या प्रकारात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.
सदर फसवणुकीत फसवणुक करणारे हे नामांकीत कुरियर कंपनीचे प्रतिनिधी बोलत असल्याचे सांगुन/भासवुन आपल्या नावे अंतराष्ट्रीय कुरियर/पार्सल बुक केल्याचे असुन त्यामध्ये ड्रग्ज, हत्यारे, बनावट पासपोर्ट, अवैद्य सिम कार्ड, हवालाचे पैसे किंवा इतर अनाधिकृत गोष्टी असल्याबाबत संपर्क साधुन सायबर गुन्हे घडत आहेत.
हे ही वाचा:
‘न्यायालय सुपर संसद झाली आहे का?’
‘बाबरी मशिद शहीद झाल्यानंतर आम्ही दंगली घडवल्या’
‘बाबरी मशिद शहीद झाल्यानंतर आम्ही दंगली घडवल्या’
कोळसा आयातदारांसाठी नोंदणी शुल्कबद्दल चांगला निर्णय
त्यामध्ये ते पोलीस, आयकर विभाग, आय.बी, सी.बी.आय, ई.डी. इत्यादी शासकीय विभागाचे अधिकारी असल्याचे बतावणी करून किंवा सोशल मिडीया माध्यमातुन अशा अधिकाऱ्यांचे बनावट ओळखपत्र व संबधित नोटीस पाठवुन नागरिकांना घाबरवुन, अटक करण्याची भिती दाखवुन बळीतांना पैसे पाठविण्यास भाग पाडतात.
अशा प्रकारच्या गुन्हयांना प्रतिबंध होणेकरीता मुंबई पोलीसांतर्फे नागरिकांना ७७१५००४४४४ व ७४०००८६६६६ हे मोबाईल क्रमांक नव्याने उपलब्ध करुन देण्यात येत असून याद्वारे नागरिकांना कॉलद्वारे किंवा व्हॉटस्अपचे माध्यमातुन पोलीसांना संपर्क साधता येईल.
“डिजिटल रक्षक” हेल्पालाईन सुविधा ही २४ तास कार्यरत राहणार असुन, त्यामध्ये नागरीकांनी नमुद क्रमांकांवर संपर्क केल्यास, फसवणुकीला बळी पडण्यापूर्वी संशयास्पद कॉल्सची व पाठविलेल्या कोणत्याही सरकारी दस्तऐवजाची देखील वैधता पडताळणी करू शकतात. तसेच घटनेचे गांभीर्य ओळखुन प्रभावी प्रतिसाद सुनिश्चित करणे व पीडितांमधील घबराट आणि त्रास कमी करण्यासाठी तेथे तात्काळ सायबर पोलीसांचे अथवा स्थानिक पोलीस ठाण्यांचे पथक पाठवुन डिजिटल अटक फसवणूक प्रकरणात पिडीताला समुपदेशन करून मदत करण्यात येईल. त्याचप्रमाणे नागरीकांना सायबर फसवणुकी पासुन बचावाकरीता योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याद्वारे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, मुंबई पोलीसांतर्फे नव्याने सुरू करण्यात आलेल्या “डिजिटल रक्षक” या सुविधेचा उपयोग करावा व सायबर सुरक्षीत रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.