लहान मुलाने एखाद्या गोष्टीसाठी हट्ट केल्याचे आपण समजू शकतो.मात्र, असाच हट्ट एका जबाबदार व्यक्तीने केल्यास आपल्या पुढे प्रश चिन्ह उभे राहते.तशीच एक घटना नागपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली.
चहा-बिस्किट वेळेत न मिळाल्यामुळे डॉक्टर रागावले आणि शस्त्रक्रिया सोडून थेट निघूनच गेल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली.विशेष म्हणजे ऑपरेशनची सर्व तयारी झाली होती, तसेच, रुग्णांना अॅनेस्थिशिया देण्यात आला होता.मात्र, वेळेत न मिळालेल्या चहा-बिस्कीटमुळे डॉक्टराने थेट शस्त्रक्रिया सोडून काढता पाय घेतला.डॉक्टरांच्या या कृत्यानं रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी ही धक्कादायक घटना घडली.
हे ही वाचा:
नेपाळमध्ये ५.६ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्यात आठ हजार घरांचे नुकसान!
शाकीब, बांगलादेशबद्दल आदर आता कमी झाला!
मराठी भाषा विद्यापीठ पुढील वर्षी जूनपासून सुरू करण्याचे नियोजन
मुंबईतील कोळीवाडा पर्यटनाचे केंद्र ठरावे यासाठी शासन कटिबद्ध
नागपुरातील जिल्हा परिषदेच्या आरोंग्य केंद्रामध्ये चार महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली जाणार होती.त्यानुसार तशी सर्व तयारी करण्यात आली होती.डॉक्टर आरोग्य केंद्रात वेळेवर आले पण त्यांना वेळेत चहा बिस्कीट मिळालं नाही. यावर डॉक्टरांना राग अनावर झाला आणि डॉक्टर आरोग्य केंद्रातून तावातावाने निघून गेले.
डॉक्टरांच्या या अजब कृत्याचा नाहक त्रास चार महिला रुग्णांनासह आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना देखील सहन करावा लागला.याप्रकरणी रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदच्या आरोग्य अधिकारी कुंदा राऊत यांची चौकशीचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, दोषी डॉक्टर भलावी यांना शुगरचा त्रास असल्यानं त्यांना चहा बिस्कीटची गरज होती. त्यामुळे वेळेत चहा बिस्कीट न मिळाल्यानं ते तिथून निघून गेल्याचं चौकशीतून समोर आल्याचं डॉ. भलावी यांनी सांगितलं आहे. त्यानंतर खात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दुसऱ्या डॉक्टरची व्यवस्था करून नियोजित शस्त्रक्रिया केल्याची माहितीही आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.