बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये साडेतीन कोटींच्या हिऱ्यांची लूट!

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये साडेतीन कोटींच्या हिऱ्यांची लूट!

बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील भारत डायमंड बोर्स कंपनी येथे हिऱ्याचे दलाल असल्याचे भासवत हिऱ्याची चोरी केली आहे. कॉउंटरवरील व्यक्तिचे लक्ष विचलित करून २ अज्ञात व्यक्तींनी ३ कोटी ५० लाख रुपयांच्या किमतीच्या हिऱ्यांची चोरी केली आहे. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील पोलिसांनी २ अज्ञात तरुणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

अज्ञात व्यक्तीने हिरे व्यापाराला फोन करून महागडे रत्न घ्यायची इच्छा व्यक्त केली. संबंधित व्यक्तीने ७ जुलै रोजी बीकेसी येथील कार्यालयात भेट दिली आणि हिरे तपासण्यास सुरुवात केली. त्यातले ३ हिरे वेगळे काढून ठेवले. हिऱ्यांसाठी पुरेसे पैसे पुढच्या आठवड्यापर्यंत घेऊन येतो असे सांगून पळ काढला, अशी माहिती बीकेसी पोलीस स्थानकांचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली.

हे ही वाचा:

६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; यादी वाचा सविस्तर

…म्हणून सलमान खानने घेतली पोलीस आयुक्तांची भेट!

मस्तीत मित्राला दिला धक्का आणि…

उत्तर प्रदेशचा अब्दुल जमील झाले श्रवणकुमार

 

गेल्या सोमवारी हिऱ्यांचे बॉक्स उघडले असता. तीन हिरे कमी असल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांनी १२ दिवसापूर्वीच सीसीटीव्ही बघितले असता आरोपीने हातचलाखी करून ३ हिरे लंपास केल्याचे दिसून आले. या आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांचे पथक आणि रेल्वे स्थानकाजवळ बसवलेले सीसीटीव्ही तपासून आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे. IPC कलम १२० (ब) अंतर्गत (गुन्हेगारी कट)रचणे, ४०९ (विश्वास भंग) आणि ४१९ अंतर्गत तोतयागिरी करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Exit mobile version