धनगर आंदोलकांनी जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालय, गाडी फोडली

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना जमाव झाला हिंसक

धनगर आंदोलकांनी जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालय, गाडी फोडली

धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणी करण्यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्च्याला जालन्यात हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करत खिडकीच्या काचा फोडल्या आहेत. तसेच कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी शेकडोंच्या संख्येने आंदोलक जमले होते.

मोर्चा दरम्यान जिल्हाधिकारी निवेदन स्वीकारायला खाली आले नाहीत, त्यामुळे आंदोलन आक्रमक झाले. यावेळी आंदोलकांनी गेटवरून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच दगडफेक करण्यात आली आहे. त्यानंतर धनगर आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसले आणि त्यांनी तोडफोडीला सुरुवात केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठेवलेल्या कुंड्या, खुर्च्या यांची नासधूस करण्यात आली. कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. यावेळी पोलिसांची संख्या कमी असल्याने त्यांना शेकडोंच्या संख्येने असलेल्या आंदोलकांना रोखता आले नाही.

हे ही वाचा:

वायू प्रदूषणाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून बिल्डरविरोधात गुन्हा दाखल

खर्गे म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी देशासाठी प्राण दिले’!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी २० मालिकेसाठी सूर्यकुमार कर्णधार!

इस्रायलकडून युद्धविराम झाला नाही तर असेच होणार अपहरण!

काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरुन जालन्या जिल्ह्यात मोठी नासधूस घडून आली होती. आता पुन्हा जालना जिल्ह्यातच आंदोलक हिंसक झाल्याने पोलिस यंत्रणेवर प्रश्व उपस्थित होत आहेत. धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करून आरक्षण जाहीर करावे या मागणीसाठी मंगळवार, २१ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे सभेत रुपांतर झाल्यानंतर मागणीचे निवेदन देण्यासाठी निघालेल्या शिष्टमंडळासोबत आंदोलनात सहभागी झालेले आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले आणि हिंसक वळण लागले.

Exit mobile version