झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातून एक भीषण आगीची बातमी आली आहे. आशीर्वाद टॉवर इमारतीला लागलेल्या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. धनबाद शहरातील जोरफाटक येथील आशीर्वाद टॉवर इमारतीमध्ये मध्ये ३१ जानेवारीच्या रात्री भीषण आग लागली होती. कोणाला काही समजण्यापूर्वीच आगीने रौद्र रूप धारण केले.
मृतांमध्ये सात महिला आणि काही लहान मुलांचाही समावेश आहे. घटनास्थळी बचावकार्य चालू असून आग लागलेल्या घटनास्थानावर मदत आणि बचाव पथकाची माणसे सतत लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी दहा ते बारा रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आहेत. घटनेची माहिती मिळताच एसएसपी संजीव कुमारही घटनास्थळी पोहोचले आहेत. अद्याप आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
Deeply anguished by the loss of lives due to a fire in Dhanbad. My thoughts are with those who lost their loved ones. May the injured recover soon: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 31, 2023
प्रकरण काय?
झारखंडमधील धनबादमध्ये एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीमुळे भीषण अपघात झाला आहे. या इमारतीला लागलेली आग इतक्या झपाट्याने पसरली की, आगीच्या ज्वाळा दूरवर दिसत होत्या . या आगीत तेरा जणांचा होरपळून त्वरित मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी त्वरित बचावकार्य सुरू केले आहे.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांच्या वेदनादायक मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त करत , त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. ही आर्थिक मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून दिली जाणार आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या इमारतीच्या आगीचे वर्णन “अत्यंत हृदयद्रावक” असे केले आहे. “जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे, आणि सर्व जखमींवर उपचार केले जात आहेत,” पुढे सोरेन असे म्हणाले की, ते वैयक्तिकरित्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.