चालत्या ट्रेन मध्ये दरोडेखोर, डाकू प्रवाशांना लुटतात हे फक्त सिनेमात पाहायला मिळतं ना? आता हे अस्सल जीवनातही घडले आहे. ही घटना कल्याण येथे देवगिरी एक्सप्रेस मध्ये घडली आहे.
ही घटना मंगळवारी रोजी सकाळी ४:३० सुमारास घडली. देवगिरी एक्सप्रेस ही नांदेडहून दादरला येत होती. ट्रेनच्या डब्यातील एस-१ डब्यात या दरोडेखोरांची टोळी चढली. ट्रेन मध्ये चढल्यावर त्यांनी सर्वांकडून रोकड आणि दागिने लुटण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या बॅगेतून सुरे काढले आणि प्रवाशांना त्यांचे सर्व सामान देण्याची धमकी देऊ लागले. रात्रीच्या अंधारात घाबरलेल्या प्रवाशांनी त्यांच्या सगळे चीज वस्तू दरोडेखोरांच्या हवाली केल्या. हा दरोडा किमान अर्धा तास चालला.
हे ही वाचा :
मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास; पण ‘आप’ला जनतेने त्यांना पूर्ण नाकारले
आपचा गुजरातमध्ये भाजपाला नाही तर काँग्रेसला फटका
…आणि सात वर्षांनंतर मृत महिला परतली
हा दरोडा घातला जात असताना काही धाडसी प्रवाशांनी दादरच्या कंट्रोल रूमशी संपर्क साधला. रेल्वे पोलिसांनी ही माहिती ऐकताच लवकरात लवकर एका पथकाची निवड केली. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी या दरोडेखोरांना दादर स्थानकावर पकडले. या दरोडेखोरांमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे आणि सहा लोकांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या चौकशीनुसार ही टोळी संभाजीनगरची होती. ज्या प्रवाशांना लुटण्यात आले आहे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीला भेट देण्यासाठी नांदेडहून मुंबईला जात होते अशी माहितीदेखील समोर आली आहे.