दिल्ली पोलिसांनी कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दोन एफआयआर दाखल केले असून १० तक्रारीही त्यांच्याविरोधात आहेत. त्या एफआयआरमध्ये बृजभूषण सिंह यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बृजभूषण सिंह यांनी लैंगिक शोषण केल्याचे त्यात म्हटले आहे.
‘पोलिसांनी म्हटले आहे की, बृजभूषण यांनी कुस्तीगीर मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याची तक्रार आहे. मुलींच्या छातीला हात लावल्याची तक्रारही त्यात आहे.
पोलिसांनी म्हटले आहे की, २१ एप्रिलला ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर जे दोन एफआयआर दाखल झाले आहेत ते २८ एप्रिलला झालेले आहेत. एफआयआरमध्ये ३५४, ३५४ (अ), ३५४ (ड) आणि ३४ ही कलमे आहेत. त्यानुसार दोषी सिद्ध झाल्यास तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते.
यातील पहिल्या एफआयआरमध्ये सहा ऑलिम्पियनची नावे आहेत तर दुसऱ्या एफआयआरमध्ये एका अल्पवयीन खेळाडूच्या वडिलांनी तक्रार केलेली आहे. तिच्या तक्रारीत तिच्या वडिलांनी म्हटले आहे की, फोटो काढण्यासाठी बृजभूषण सिंह यांनी तिला घट्ट पकडले होते. त्यांनी तिचे खांदे दाबले आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला.
हे ही वाचा:
सरकारी अधिकारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत
बारावीनंतर दहावीतही कोकण सर्वोत्तम
‘मद्यधोरण चांगले होते तर मागे का घेतले?’
इतिहासातील इतर नायकांपेक्षा छत्रपती शिवराय अद्भूत!
तिचा पाठलाग केला जात असल्याचेही त्यात नमूद केले आहे. बृजभूषण यांनी तसे करू नये असेही तिने त्यांना सांगितले होते, असाही उल्लेख आहे. या तक्रारींपैकी एका तक्रारीत म्हटले आहे की, रात्रीचे जेवण घेत असताना बृजभूषण यांनी तिच्या खांद्याला, गुडघ्यांना आणि हाताच्या तळव्याला स्पर्श केला. छाती आणि पोटालाही स्पर्श केला. एका तक्रारीत म्हटले आहे की, बृजभूषण यांनी त्या खेळाडूचे टी शर्ट खेचले आणि छातीवर हात ठेवला. बृजभूषण यांनी आपल्याला जवळ ओढल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
एका तक्रारीत म्हटले आहे की, आपल्याला बृजभूषण यांनी मिठी मारली आणि काही आमिष दाखवले. एका मुलीने म्हटले आहे की, ती रांगेत उभी असताना बृजभूषण यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला.