पान मसाला, तंबाखू खात असाल तर खबरदारी बाळगा. थुंकण्यापूर्वी एकदा इकडे तिकडे लक्ष द्या नाहीतर दंड भरावा लागेल, अशा घोषणा आपण ऐकत असतो. पण सर्वसामान्य नव्हेत तर पोलिसांनाही या घोषणांचा विसर पडतो. मध्य प्रदेशातील शहडोलमध्ये अशाच एका प्रकरणात चार पोलिसांवरच कारवाई करण्याची वेळ आली आहे.
मध्य प्रदेशातील शहडोलमध्ये पान मसाला खाऊन पोलिस स्टेशनचा परिसर घाण केल्याप्रकरणी चार पोलिसांवर एसपींनी चांगलीच अद्दल दिली आहे. एसपी पोलिस स्टेशनची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात अनेक ठिकाणी पान मसाला खाऊन थुंकल्याचे डाग असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
जिल्ह्याचे एसपी अवधेश गोस्वामी पोलिस स्टेशनमध्ये दौऱ्यावर गेले होते. पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीत गुटखा खाऊन थुंकल्याने कोपरे लाल झाल्याचे त्यांनी पाहिले. पोलीस ठाण्यातील अस्वच्छता पाहून त्यांचा संताप अनावर झाला. एसपींनी लगेच टीआयला याचे कारण विचारले असता टीआयने सांगितले की, एक सब इन्स्पेक्टर, दोन एएसआय आणि एका कॉन्स्टेबलला गुटखा खाण्याची सवय आहे. हे गुटखा खाल्यानंतर ते पोलिस ठाण्याच्या आवारातच थुंकतात. असे त्यांच्या निदर्शनास आले.
हे ही वाचा:
सौदी अरबमध्ये तब्लिघी जमातवर बंदी
ऋतुराजला आला बहर, झळकाविले तिसरे शतक
मुंबईत १४४ ‘कलम’; एमआयएमच्या सभेला गर्दी
‘ओबीसी आरक्षण संपवण्याचा ठाकरे सरकारच्या षडयंत्राचा डाव उघड’
एसपी गोस्वामी यांनी एसआय नंदकुमार कचवाह, देवेंद्र सिंग, हवालदार प्यारे लाल सिंग, एएसआय दिनेश त्रिवेदी यांना पोलीस स्टेशन गलिच्छ केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई केली आहे. या लोकांना पोलीस ठाण्याच्या आवारात कचरा टाकण्याबाबत यापूर्वीही ताकीद देण्यात आली होती. पोलिस ठाण्यातील गोंधळ पाहून एसपींनी घटनास्थळीच निर्णय घेत चार दोषी पोलिसांना तात्काळ हजर राहण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे. या वृत्तानंतर इतर पोलीस ठाण्याचे पोलीसही सतर्क झाले आहेत.
Four police personnel, namely SI Nandkumar Kachwaha, Additional SI Dinesh Dwivedi, ASI Devendra Singh & head constable Pyare Lal, have been attached to the Police line. Despite giving warnings, they spat tobacco in the Gohparu PS premises: Addl SP Mukesh Vaishya in Shahdol, MP pic.twitter.com/QJzvhaDW8W
— ANI (@ANI) December 11, 2021