जबलपूरमध्ये कुस्तीच्या आखाड्यातील हनुमानाच्या मूर्तीची विटंबना

अल्पवयीन आरोपीला अटक

जबलपूरमध्ये कुस्तीच्या आखाड्यातील हनुमानाच्या मूर्तीची विटंबना

मध्य प्रदेशाच्या जबलपूर जिल्ह्यात कट्टरपंथीयांकडून हनुमान मूर्तीची विटंबना करण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जबलपूर जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असणाऱ्या जय बजरंग कुस्तीच्या आखाड्यातील हनुमानाच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली आहे. या घटनेनंतर संतप्त हिंदूंनी आखाड्यात मुस्लिमांना प्रवेश पूर्णपणे निषिद्ध केला आहे. तर, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

माहितीनुसार, पाटण तालुक्यातील भगवान हनुमानाच्या आखाड्यात एका १४ वर्षीय अल्पवयीन कट्टरपंथी तरुणाने प्रवेश केला. त्यानंतर त्याने हनुमानाच्या मूर्तीची विटंबना करत पुतळा जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्याने आखाड्यातील व्यायामाच्या वस्तू फेकून देऊन नुकसान करण्याचा प्रयत्नही केला. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच हिंदू संघटनेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले असून त्यांनी निषेध नोंदवला.

हे ही वाचा : 

मातोश्रीवर संजय राऊत यांना बुकलले? सोशल मीडियावर गरमागरम चर्चा

नव वर्षाच्या पहिल्या दिवशी लखनऊ हत्याकांडाने हादरलं; चार बहिणींसह आईची हत्या

संतोष देशमुख प्रकरण, आरोपीच्या अटकेसाठी मस्साजोग ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन!

“केजरीवालांनी खोटे बोलण्याची आणि फसवणुकीची वाईट सवय सोडून द्यावी”

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ अल्पवयीन आरोपीला अटक केली असून तो मनोरुग्ण असल्याची माहिती दिली आहे. तसेच त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे ही सांगितले. यानंतर आखाड्यात मुस्लिमांना प्रवेश नसल्याचे हिंदूंनी जाहीर केले आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीवर कारवाई केली असून परिसरात शांतता राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेनंतर पाटण पोलीस ठाणे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Exit mobile version