25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरक्राईमनामाहैदराबादमध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीची विटंबना

हैदराबादमध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीची विटंबना

पोलिसांकडून तपास सुरू

Google News Follow

Related

हैदराबादमध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हैदराबादमधील नामपल्ली मैदानावर दुर्गा मातेच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि भक्तांमध्ये नाराजी पसरली असून खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, नामपल्ली एग्जीबेशन ग्राऊंडवर एग्जीबेशन सोसायटीच्या माध्यमातून ही मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. दरवर्षी येथे हा उत्सव भरवला जातो. मात्र, बुधवारी कोणीतरी या मूर्तीची विटंबना केल्याची घटना आणि दानपेटी हलवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना घडताच तातडीने याची तक्रार पोलिसांना करण्यात आली असून बेगम बाजार पोलीस ठाण्यातील पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

एसीपी चंद्रशेखर यांनी सांगितले की, या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस त्यादिवशीचा गरबा संपेपर्यंत घटनास्थळी उपस्थित होते. याप्रकरणी स्थानिक नागरिक आणि भक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

पोलीस इन्स्पेक्टर विजय यांनी एएनआयला माहिती देताना सांगितले की, काही अज्ञाच व्यक्तींनी नामपल्ली एग्जीबेशन ग्राऊंडवरील दुर्गा मातेच्या मंडपातील दानपेटी हटवली आहे. तसेच दुर्गा मातेच्या मूर्तीचे हात तुटलेल्या अवस्थेत आहेत. आयोजकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

शिवाजी मंदिर ट्रस्टवरून महाराव यांची हकालपट्टी करा!

शांततेचा नोबेल पुरस्कार अण्वस्त्रमुक्त जगासाठी काम करणाऱ्या जपानच्या संस्थेला

दिल्ली पोलिसांची पुन्हा मोठी कारवाई, २००० कोटींचे कोकेन जप्त!

बलुचिस्तानमध्ये कोळसा खाणकाम मजुरांवर गोळीबार; २० जण ठार

दरम्यान, या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी म्हटले आहे की, “नामपल्ली एग्जीबेशन ग्राऊंडवरील दुर्गा मातेच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली आहे. बेगम बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा परिसर येतो. जेव्हा मी भाग्यलक्ष्मी मंदिरासाठी ट्विटवर आवाज उठवला तेव्हा मला नोटीस पाठवण्यात आली आणि माझे ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्यात आले. मात्र मी मागे हटणार नाही. हे भाग्यनगर आहे , पाकिस्तान नाही. इथे असे कृत्य घडणे ही निंदनीय आहे,” असे अग्रवाल यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा