शिवडी न्हावाशेवा अटल सेतू वरून बँकेच्या डेप्युटी मॅनेजरने समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. सुशांत चक्रवर्ती असे डेप्युटी मॅनेजरचे नाव आहे. मागील काही आठवड्यापासून कामात असलेल्या दबावातून त्याने हे पाऊल उचलले असा आरोपी त्याच्या पत्नीने केला आहे. सुशांत चक्रवर्तीचा मृतदेह अद्याप मिळून आला असून रात्री उशिरापर्यंत शोध घेण्याचे काम सुरू होते. या प्रकरणी शिवडी पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवडी न्हावाशेवा अटल सेतू वरील नवीमुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवरील किलोमीटर क्रमांक ८.५ या ठिकाणी लाल रंगाची ब्रेजा क्रमांक
(एमएच०१-डिटी-९१८८) ही कार बराच वेळेपासून उभी असल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांना मिळाली. वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कारची तपासणी केली असता कारमध्ये कोणीही मिळून आले नाही.
दरम्यान ही माहिती शिवडी पोलिसांना देण्यात आली. शिवडी पोलिसांनी अटल सेतू नियंत्रण कक्ष येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले एक व्यक्ती सकाळी ९:५७ च्या अटल सेतू पुलावर लाल रंगाचा ब्रेजा कारने अतुल सेतू पुलावर थांबला आणि कळण्याच्या आत त्याने कार मधून बाहेर पडून अटल सेतू वरून समुद्रात उडी घेतली.
हे ही वाचा:
१ कोटी ४० लाख जनतेचे जम्मू- काश्मीरमधील अधिकार भाजपाने २०१९ मध्ये १४० करोड लोकांना दिले
ठाणे-मेट्रो रेल्वे प्रकल्पास गती, शेतकऱ्यांना कापूस-सोयाबीन अनुदान वितरण सुरू!
किमान देवांना राजकारणापासून दूर ठेवा
राज्यात गायी राज्यमाता-गोमाता; पोषणासाठी मिळणार अनुदान
पोलिसांनी ब्रेजा या कारच्या क्रमांकावरून सदर व्यक्तीची ओळख पटवली असून सुशांत चक्रवर्ती (४०) असे त्याचे नाव असून तो परळ व्हिलेज येथे राहण्यास होता. सुशांत एका सरकारी बँकेत विमा पॉलिसी विभागात डेप्युटी मॅनेजर या पदावर नोकरीला होता.पोलिसांनी त्याच्या कुटूंबियांशी संपर्क साधला असता त्यांची पत्नीने शिवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबात म्हटले आहे, की सुशांत चक्रवर्ती हा सकाळी कामावर जातो म्हणून घरातून बाहेर पडला होता, मागील काही आठवड्यापासून त्याला कामाचा अधिक ताण होता, त्यात तो मागील काही दिवसापासून तणावात होता अशी माहिती त्याच्या पत्नीने पोलिसांना दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांत हा सकाळी शिवडी येथून न्हावाशेवा अटल सेतुवर गेला, मात्र अटल सेतुवर कर्मचारी असल्यामुळे त्याने टोल नाका ओलांडून न्हावा शेवाच्या दिशेने गेला, तेथून त्याने वळण घेऊन पुन्हा मुंबईच्या दिशेने आला आणि त्याने शिवडीच्या हद्दीत अटल सेतुवर कार उभी करून समुद्रात उडी घेतली, ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून त्याचा मृतदेहाचा शोध सुरू आहे अशी माहिती शिवडी पोलिसांनी दिली आहे. पोलीसानी या घटनेची नोंद केली असून मृतदेह मिळून आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.