उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने पाच वर्षीय पोटच्या मुलाला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही, इमारतीखाली उभ्या असलेल्या व्यक्तीने त्या मुलास झेलल्यामुळे त्याचे प्राण वाचले.
रविवार (८ सप्टेंबर) ही घटना घडली. देवरियातील महर्षी देवराह बाबा मेडिकल कॉलेजच्या नवीन ओपीडीच्या दुमजली इमारतीतून एका व्यक्तीने आपल्या मुलाला खाली फेकून दिले. विनय प्रसाद असे या निर्दयी आरोपी बापाचे नावे आहे. गौरीबाजार पोलीस ठाण्याच्या सोपरी येथील हे रहिवासी आहेत. आरोपी विनय प्रसाद हा अमली पदार्थांच्या आहारी गेला होता.
आरोपी विनय प्रसादचा पाच वर्षीय मुलगा लकी हा हर्निया आजाराने त्रस्त होता. उपचारासाठी लकीला त्याची आई अंजू देवी हिने महर्षी देवराह बाबा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले होते. ४ सप्टेंबर रोजी मेडिकल कॉलेजच्या शस्त्रक्रिया विभागात लकीवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
हे ही वाचा :
पॅरिस पॅरालिम्पिक पदक विजेत्यांवर बक्षिसांचा पाऊस!
१६ वर्षांखालील मुलांना ऑस्ट्रेलियात ‘सोशल मीडियाबंदी’
उमर गौतमसह १४ जणांची धर्मांतरणाची टोळी दोषी !
अमेरिकेत चीनची भांडी घासतायत राहुल गांधी…
रविवारी अचानक विनय प्रसाद आणि त्याची पत्नी अंजू देवी यांच्यात भांडण झाले. या वादानंतर आरोपी बापाने आपल्या मुलाला लघवीच्या बहाण्याने खिडकी जवळ नेले आणि खाली फेकून दिले. सुदैवाने इमारतीखाली उभ्या असलेल्या व्यक्तीने मुलाला झेलले, त्यामुळे त्याचे प्राण वाचले.
या घटनेनंतर आरोपी बापाला उपस्थित लोकांनी जबर चोप दिला. त्यानंतर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. मात्र, आरोपी विरुद्ध त्यांच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दाखल करण्यात न आल्याने त्याला सोडण्यात आले, असे कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी दिलीप सिंह यांनी सांगितले.