28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामाएका डेंटिस्टचे साखरपुड्याच्या दिवशी अपहरण

एका डेंटिस्टचे साखरपुड्याच्या दिवशी अपहरण

वैशाली नावाच्या डेंटिस्टच्या घरी घुसले पन्नास गुंड !

Google News Follow

Related

एका २४ वर्षीय डेंटिस्टचे तिच्या साखरपुड्याच्या दिवशी अपहरण झाल्याची घटना शुक्रवारी हैदराबादमध्ये तिच्या अदिबातला याठिकाणी असलेल्या निवासस्थानी घडली. वैशाली असं त्या डेंटिस्टचे नाव आहे.  कार आणि ट्रकमधून आलेल्या ५० जणांच्या सशस्त्र जमावाने या डेंटिस्टच्या घरी हल्ला केला. नवीन रेड्डी, मिस्टर टी या उच्चस्तरीय पेय आउटलेटच्या मालकाने वैशालीला तिच्या घराच्या दुसऱ्या मजल्याच्या खोलीतून खाली ओढले आणि तिला कारमध्ये बसवून घेऊन गेले. अर्धा तास ही थरारक घटना चालली. स्वतःचे रक्षण करताना आणि त्या लोकांच्या तावडीतून सोडवताना, डेंटिस्ट वैशाली आणि तिच्या कुटुंबीयांना गंभीर दुखापत झाली. त्याच रात्री वैशाली शहराच्या उपनगरात जखमी अवस्थेत सापडली. पोलिसांना तिला शोधण्याकरिता आठ तास लागले. पोलिसांनी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत आठ जणांना अटक केली. तर मुख्य आरोपी नवीन हा अजूनही फरार आहे.

हे ही वाचा :

पवारांचा गणपत वाणी झालाय का?

बुलेट ट्रेनसाठी खारफुटीची झाडे तोडण्यास न्यायालयाचा हिरवा कंदिल

रेल्वेचा कुली; पण गरिबांचा शिक्षक

इशान किशनने पाडला बांगलादेशमध्ये पाऊस, १२६ चेंडूंत २०० धावांचा विश्वविक्रम

हे कृत्य जेव्हा सकाळी त्यांच्या शेजाऱ्याना कळले तेव्हा त्वरित त्यांनी पोलीस तक्रार नोंदवली, परंतु पोलिसांचा काही नेम नव्हता. स्वतःची ओळख गुप्त ठेवण्यासाठी त्या गुंडांनी सगळे सीसीटीव्ही कॅमेरे तोडून टाकले. घराचे ताठ सोसायटीचे देखील खूप नुकसान झाल्याचे समोर आले आहे. जाताना त्या गुंडानी अनेक फर्निचरांची तोडफोड केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा