रविवारी २० ऑक्टोबर रोजी, संहौला पोलिस हद्दीतील तलावाजवळील शिवशक्ती मंदिर तोडफोड प्रकरणी भागलपूरमध्ये निदर्शने करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बदमाशांनी भगवान राम, लक्ष्मण, माता सीता, राधा कृष्ण आणि माँ दुर्गा यांच्या मूर्ती फोडल्या. या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक हिंदू समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी सकाळी ७ वाजता मंदिराचे पुजारी आले आणि त्यांना सहा मूर्ती तुटलेल्या अवस्थेत दिसल्या. त्यांनी तत्काळ गावकऱ्यांना फोन करून घटनेची माहिती दिली. स्थानिक पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने हिंदू जमा झाले आणि त्यांनी तीन तास रास्ता रोको करून निषेध केला.
हे ही वाचा :
मुंबई विमानतळावर २ किलो सोने जप्त!
सोमवारी पिंपरीत होणार ब्राह्मण सामर्थ्य संमेलन
आसाम पोलिसांची मोठी कारवाई, ६ कोटींचे हेरॉईन जप्त!
भगवा दहशतवाद’ शब्द वापरणे ही चूक होती
संतप्त स्थानिक लोकांनी हातात लाठ्या घेऊन पोलिस ठाण्यावर धाव घेतली. मूर्तींच्या तोडफोडीला जबाबदार असलेल्यांना अटक करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या प्रकरणी पोलिसांनी मानसिक आजारी असल्याचे सांगून एका व्यक्तीला अटक केली आहे. या घटनेसंदर्भात संबंधित व्यक्तीची चौकशी करण्यात येत आहे. मात्र, मूर्तींचे जेवढे नुकसान झाले आहे, ते एका व्यक्तीचे काम असू शकत नाही, असा दावा स्थानिकांनी केला आहे. याशिवाय मंदिरातून १० लाख रुपयांचे दागिनेही चोरीला गेल्याचा आरोप भाविकांनी केला. दरम्यान, पोलिसांनी अद्याप चोरीच्या आरोपांना दुजोरा दिलेला नाही. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.