दिल्ली: प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी चोरट्याचा २०० वेळा विमान प्रवास!

आरोपी अटकेत

दिल्ली: प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी चोरट्याचा २०० वेळा विमान प्रवास!

केवळ ट्रेनमध्येच नाही तर विमानातही चोरीच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.अशीच एक घटना समोर आली आहे.विमानातील प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरण्यासाठी चोरट्याने तब्बल २०० वेळा विमानाने प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.विमानातील प्रवाशांच्या हॅण्डबॅगमधून दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पत्रकार परिषदेदरम्यान पोलीस उपायुक्त (IGI) उषा रंगनानी यांनी सोमवारी(१३ मे) सांगितले की, विमानातील प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे.आरोपीचे नाव राजेश कुमार असे आहे.आरोपीने चोरी करण्यासाठी ११० दिवसात तब्बल २०० विमानाच्या फेऱ्या मारल्या आहेत.आरोपीला पहाडगंज येथून अटक करण्यात आली. चोरीचे दागिने त्याने तिथेच ठेवले होते. आरोपी हे दागिने शरद जैन (४६) या व्यक्तीला विकणार होता.दागिने खरेदी करणाऱ्या शरद जैन यालाही करोलबाग येथून अटक केली आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

 

हे ही वाचा:

दिल्ली दारू घोटाळाप्रकरणी आता ‘आप’ आरोपी

इराण- भारतमधील चाबहार बंदराचा करार अमेरिकेला खुपला; निर्बंधांची दिली धमकी

लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिदनी २०२१मध्ये दिली होती होर्डिंगला परवानगी

पुरात सापडलेल्या केनियाला भारताने पुन्हा दिला मदतीचा हात!

पोलीस उपायुक्त (IGI) उषा रंगनानी पुढे म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांत वेगवेगळ्या फ्लाइटमध्ये चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर गुन्हेगारांना पकडण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली.सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटल्यानंतर कारवाईला सुरुवात केली आणि आरोपीला अटक केली.त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर आरोपीने अशा चोरीच्या ५ गुन्ह्यांमध्ये आपला सहभाग असल्याची कबुली दिली.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी विशेषतः आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलांना लक्ष्य करत असे.बहुतेक प्रवासी त्यांच्या हँडबॅगमध्ये मौल्यवान वस्तू ठेवतात याची माहिती आरोपीला होती.एअरलाइन्स आणि तपास एजन्सींकडून पकडले जाण्याच्या भीतीने आरोपी आपली ओळख बदलत असे.तसेच तो आपल्या मृत भावाच्या नावाने तिकीट बुक करत असे.अखेर आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Exit mobile version