आंदोलक कुस्तीपटूंविरोधात दिल्ली पोलिस गुन्हे मागे घेणार

विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अन्य आंदोलक कुस्तीपटूंविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घेणार

आंदोलक कुस्तीपटूंविरोधात दिल्ली पोलिस गुन्हे मागे घेणार

२८ मे रोजी संसद भवनाकडे मोर्चा नेणारे विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अन्य आंदोलक कुस्तीपटूंविरोधात दाखल केलेले गुन्हे दिल्ली पोलिस मागे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रृजभूषणसिंह यांना लैंगिक छळाच्या आरोपावरून अटक करण्याच्या मागणीसाठी कुस्तीपटू गेले कित्येक दिवस आंदोलन करत होते. २८ मे रोजी त्यांनी नवीन संसद भवनाच्या उद्‌घाटनावेळी तिथे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना अडवले. यात अनेक कुस्तीपटूंची धरपकड करण्यात आली. तसेच, त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. त्यावेळी विनेश फोगट यांनीही उपहासात्मक प्रतिक्रिया देताना ‘नवा इतिहास लिहिला जात आहे,’ असे म्हटले होते. “दिल्ली पोलिसांनी ब्रृजभूषण यांच्यावर लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी सात दिवसांचा कालावधी घेतला, परंतु शांततापूर्ण आंदोलन केल्याबद्दल आमच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यास सात तासही लागले नाहीत. देश हुकूमशाहीकडे वळला आहे का? सरकार आपल्या खेळाडूंशी कसे वागते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. एक नवा इतिहास लिहिला जात आहे,’ असे विनेश फोगट यांनी ट्विटरवर म्हटले होते.

तसेच, बजरंग पुनिया यांनीही ‘पोलिसांनी मला त्यांच्या ताब्यात ठेवले आहे. ते काहीच बोलत नाहीत. मी काही गुन्हा केला आहे का? ब्रृजभूषण तुरुंगात असायला हवे होते. आम्हाला तुरुंगात का ठेवले आहे?’, असा सवाल केला होता.

हे ही वाचा:

मकोका लागलेल्या गँगस्टरशी राऊत बंधूंची सलगी कशी?

अंतराळातून ‘बिपरजॉय’ असं दिसतं!

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी चोरीच्या प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

आशिया कप क्रिकेट स्पर्धा होणार पाकिस्तान, श्रीलंकेत

या कुस्तीपटूंवर कलम १४७ (दंगल केल्याबद्दल दोषी), कलम १४९ (बेकायदा सभा आयोजित करणे), १८६ (सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावण्यात अडथळा आणणे), १८८ (सरकारी कर्मचाऱ्याने दिलेल्या आदेशाचे पालन न करणे), ३३२ (स्वेच्छेने दुखापत करणे) या कलमांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. सार्वजनिक कर्मचाऱ्याला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी गुन्हेगारी शक्तीचा वापर करणे या भारतीय दंड संहितेच्या ३५३ कलमांतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Exit mobile version