दिल्लीच्या गाझीपूर शहरातील बाजारात बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. एका बेवारस बॅगमध्ये स्फोटके आढळून आली होती. त्यानंतर जवळच्या एका रिकाम्या शेतात खड्डा खोडून ही स्फोटके निकामी करण्यात आली आहेत. या बॅगेमध्ये स्फोटके आणि आयईडी होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी एक्सप्लोजिव्ह कायद्याअंतर्गत दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रजासत्ताक दिन तोंडावर असताना राजधानीच्या शहरात बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीमधील गाझीपूर परिसरातील फूल बाजारात एक बेवारस बॅग आढळून आली. त्यानंतर सकाळी १०.५० वाजता एका पीसीआर कॉलवर गाझीपूर फूल बाजाराजवळ बॉम्ब असल्याची माहिती मिळाली, त्यानंतर खबरदारी म्हणून बॉम्ब निकामी पथकाला पाचारण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
IED recovery at Ghazipur Flower Market: "A case is being registered in the Delhi Police Special Cell under provisions of the Explosive Act," says Delhi Police
— ANI (@ANI) January 14, 2022
हे ही वाचा:
चित्रपट दिग्दर्शक अली अकबर पत्नीसह झाले हिंदू
अर्थसंकल्पीय अधिवेशन या तारखेला होणार
अयोध्येत योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात उभी राहणार शिवसेना
बेवारस बॅगची माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल, स्थानिक पोलीस, बॉम्बशोधक पथक आणि एनएसजीची टीमने घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर बाजाराजवळील एका रिकाम्या शेतात खड्डा खोदून बॅगमधील ही स्फोटके निकामी करण्यात आली. या बॅगेमध्ये स्फोटके आणि आयईडी पेरण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. या घटनेनंतर संपूर्ण परिसराची तपासणी केली जात आहे.