दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी जहांगीर पुरी हिंसाचारातील सर्व आरोपींची जवळपास तीन तास चौकशी केली आहे. पोलीस आयुक्त राकेश अस्थाना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास रोहिणी येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी सुमारे तीन तास आरोपींची चौकशी केली आहे. राकेश अस्थाना या घटनेचा सूत्रधार कोण याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
याशिवाय राकेश अस्थाना यांनी ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांनाही पत्र लिहून या हल्ल्यातील मुख्य आरोपी अन्सार याचाही मनी लाँड्रिंगमध्ये सहभाग तर नाही ना, याची चौकशी करण्यास सांगितले आहे. जहांगीर पुरी हिंसाचारातील मुख्य आरोपी अन्सार याने जुगाराच्या पैशाने अनेक मालमत्ता खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अन्सारला हे पैसे इतर कोणाकडून मिळालेत का किंवा अन्सारनेच चुकीची कामे करून ही रक्कम जमा केली आहे का, याचा तपास पोलिसांना ईडीमार्फत करायचा आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अन्सारसह पाच जणांवर एनएसए लावले आहेत.
हे ही वाचा:
अमित मिश्राची फिरकी, इरफान पठाण क्लीन बोल्ड
गुरु तेग बहादूर शौर्याचा आदर्श ठेवतात; प्रकाशपर्वाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश
लवकरच विजय मल्ल्या, नीरव मोदी भारताच्या स्वाधीन
‘हिंदुत्वावर मते मागणारे मुख्यमंत्री हनुमान चालिसाला विरोध करतात!’
हनुमान जयंतीनिमित्त दोन गटांमध्ये हिंसाचार उसळला होता. या उसळलेल्या हिंसाचारात आठ पोलीस जखमी झाले होते. दंगलखोरांनी या काळात अनेक वाहने जाळली आणि जोरदार दगडफेक केली होती. दिल्ली पोलीस गुन्हे शाखेच्या स्पेशल सेलच्या सहकार्याने या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी २५ जणांना अटक केली असून त्यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.