22 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामाचक्क अभिषेक बच्चन, सैफ अली खान, हृतिक यांच्या नावांची पॅनकार्ड बनवून फसवले

चक्क अभिषेक बच्चन, सैफ अली खान, हृतिक यांच्या नावांची पॅनकार्ड बनवून फसवले

सेलिब्रिटींच्या तपशिलाचा वापर करत होती टोळी

Google News Follow

Related

अभिषेक बच्चन, महेंद्रसिंह धोनी, सोनम कपूर, सचिन तेंडुलकर, सैफ अली खान, ह्रतिक रोशन, आलिया भट्ट, शिल्पा शेट्टी, यासारख्या सेलिब्रिटीच्या तपशिलाचा वापर करून ५० लाख रुपयांहून अधिक रकमेची बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी एकूण पाच जणांच्या टोळीला अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे, असे डीसीपी शाहदरा , रोहित मीणा यांनी सांगितले आहे.

पुढे त्यांनी असेही सांगितले कि विविध सेलिब्रिटींच्या नावाची पॅनकार्ड वापरून ते बँकांना फसवत राहिले होते. पुनीत, मोहम्मद असिफ, सुनील कुमार, पंकज मिश्र, आणि विश्व भास्कर शर्मा अशा पाच आरोपींना पुण्यातील फिनटेक स्टार्टअप वन कार्डची अत्यंत असामान्य पद्धतीने फसवणूक करण्यासाठी सगळ्यांच्या समन्वयाने काम केले, असे दिल्ली पोलिसांनी संगितले आहे.

सायबर फसवणुकीच्या या विचित्र प्रकरणात या टोळीने अनेक सेलिब्रिटी जसे बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्री, तसेच क्रिकेटपटूचे पॅनकार्ड आणि जीएसटी क्रमांकावरून जे ऑनलाईन उपलब्ध होते त्यांच्या नवे क्रेडिट कार्ड पुण्यातल्या  फिनटेक  स्टार्टअप ‘वन कार्ड’ कडून त्यांनी काढून घेतले. दिल्ली पोलीस उपयुक्त रोहित मीणा यांनी सांगितले कि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु असल्यामुळे आम्ही आत्ता जास्त भाष्य करू शकत नाही.

त्या स्टार्टअप कंपनीला यांच्या फसवणुकीची त्यांनी कार्डाचा वापर करत २१. ३२ लाख रुपयांची उत्पादने खरेदी केल्यामुळे कुणकुण लागली आणि त्यांनी त्वरित दिल्ली पोलिसांना लगेचच सतर्क केले. त्यावर कारवाई करत दिल्ली पोलिसांनी यांना अटक केली.

हे ही वाचा:

हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचे सुश्मिता सेनने लिहिले आणि…

दोघे गुजरातवरून आले आणि शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याची भिंत ओलांडली

ओदिशात सापडले १०० नंबरी सोने…

कसब्यावर बोलू काही… भाजपाच्या सोशल इंजिनिअरींगमध्ये ब्राह्मणांना स्थान नाही का?

कशा प्रकारे फसवले?

गूगलवर सेलिब्रिटींची जन्मतारीख उपलब्ध असल्याने पॅन आणि जन्मतारीख यांचा पूर्ण तपशील असतो. त्यांनी त्यांच्या पॅन कार्डवर स्वतःचे फोटो टाकले आणि पॅन कार्ड रिमेक केले. जेणेकरून त्यांचा पॅन आणि आधार कार्डावर फोटो जुळेल. उदाहरणादाखल ,अभिषेक बच्चनच्या पॅनकार्डवर त्याचा पॅन आणि जन्मतारीख तर फोटो या टोळीतील एका आरोपीचा. ही सगळी माहिती मिळवून त्यांनी क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला. ज्यावेळेस त्यांनी पडताळणी करण्यासाठी सहजच प्रश्नांची उत्तरे दिली कारण, हे सर्व तपशील त्यांना सिबिल कडून मिळाला होता. या टोळीला माहिती होते कि, सेलिब्रिटींना चांगले सिबिल स्कोर मिळणार हे त्यांना माहिती होते. त्यामुळे त्यांना क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यताच जास्त होती.

आणखी महत्वाचे म्हणजे “ऑनलाईन पडताळणी प्रणाली” ही अभिषेक बच्चनला ओळखू शकत नाही. म्हणूनच आरोपी पंकज मिश्रा याचा फोटो अभिषेक बच्चनच्या पॅन,आधार तपशिलांसह जारी करण्याची त्यांनी हिम्मत केली.  इतरही बँका आणि वित्तीय संस्था यांचा क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी वापर केला आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांना हे चांगलेच माहित होते कि, जीएसटी चे पहिले दोन अंक हे त्या राज्याचे कोड असतात आणि पुढील दहा अंक हे  पॅनचे असतात.

काय म्हणते क्रेडिट कार्ड कंपनी?

पुणेस्थित एफपी एल टेक्नो लॉजीज प्रा. लिमिटेड “वन कार्ड ” जरी करते जे एक संपर्क रहित मेटल क्रेडिट कार्ड आहे. त्यासोबत वन कार्ड आणि वन स्कोअर ऐप मध्ये त्याचे ऑनलाईन प्रस्तुतीकरण होते. जेणेकरून कोणतेही ग्राहक सगळ्या एपवर त्याचा उपयोग करतात. यावर सर्व व्यवहार आधारित असतात. असे कंपनीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. या आरोपींनी पॅन , आधार, आणि जन्मतारीख तीच ठेवून बनावट पॅन कार्ड अपलोड केले. असेही पुढे तक्रारीत म्हंटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा