बनावट पासपोर्ट, व्हीसाच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

ऑस्ट्रेलिया, चीन आणि इतर युरोपीय देशांचे ३२५ बनावट पासपोर्ट आणि १७५ पेक्षा जास्त बनावट व्हिसा जप्त

बनावट पासपोर्ट, व्हीसाच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

दिल्लीमध्ये बनावट पासपोर्ट आणि व्हीसाच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आयजीआय विमानतळ पोलीस उपायुक्त तनु शर्मा यांनी या आंतरराष्ट्रीय बनावट पासपोर्ट आणि व्हिसा रॅकेटची माहिती दिली आहे. हे रॅकेट बराच काळ कार्यरत होते आणि त्यांच्याकडे बनावट रबर स्टॅम्प, व्हिसा आणि ड्रायव्हिंग लायसन्स होते.

झाकीर हा या प्रकरणी मुख्य सूत्रधार आहे. त्यांनी २०० लोकांना परदेशात पाठवले आहे, पण आम्ही त्याचा अधिक तपास करत आहोत. यामध्ये आणखी लोकांना अटक करण्यात येणार असल्याचं उपायुक्त तनु शर्मा यांनी सांगितलं. दिल्ली पोलिसांच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळ युनिटने ही अटक केली आहे.

वर्षाच्या सुरुवातीला जूनमध्ये रवी रमेशभाई चौधरी नावाच्या व्यक्तीला कुवेतमधून हद्दपार केल्यानंतर या बनावट रॅकेटचा संपूर्ण तपास सुरू झाला. त्याच्याकडे डुप्लिकेट पासपोर्ट असल्याचे अधिकाऱ्यांना आढळल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ, इमिग्रेशन आणि विमानतळ प्राधिकरणांकडून १ हजार २०० हून अधिक रबर स्टॅम्प देखील जप्त करण्यात आले आहेत. हे रॅकेटर्स सुरक्षा मंजुरी मिळवण्यासाठी वापरत होते, असं उपायुक्त शर्मा म्हणाल्या.

हे ही वाचा:

रॅकेटच्या मास्टरमाईंडला मुंबईत अटक

या रॅकेटचा मास्टरमाइंड झाकीर युसूफ शेख याला मुंबईतून अटक करण्यात आल्याची माहिती डीसीपी (आयजीआय) तनु शर्मा यांनी दिली आहे. झाकीरने अनेक मराठी वेब सिरीजमध्ये भरपूर पैसे गुंतवले असल्याचेही डीसीपी म्हणाले. याप्रकरणी आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यात एका प्रवाशाचाही समावेश आहे.

३२५ बनावट पासपोर्ट जप्त

डीसीपी शर्मा यांनी जप्त केलेल्या बनावट पासपोर्ट आणि बनावट व्हिसाबाबतही माहिती दिली. अटक करण्यात आलेल्यांच्या ताब्यातून ऑस्ट्रेलिया, चीन आणि इतर युरोपीय देशांचे ३२५ बनावट पासपोर्ट आणि १७५ पेक्षा जास्त बनावट व्हिसा जप्त करण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.

मुंबई, गुजरात रॅकेटचे केंद्रबिंदू

बनावट पासपोर्ट आणि व्हिसाची व्यवस्था करण्यात या रॅकेटचा सहभाग होता. याद्वारे त्यांनी बेकायदेशीर मार्गाने लोकांना अमेरिकेत स्थायिक होण्यास मदत केली. झाकीर मुंबईतून कार्यरत असताना, नारायणभाई नावाचा आणखी एक आरोपी गुजरातमधून कार्यरत होता. हे रॅकेट मुख्यतः मुंबईत आणि गुजरात मधून चालवण्यात येत होतं.

Exit mobile version