सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अवैधरित्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रकरणातील प्रमुख आरोपी नवनीत कालरा यांच्या विरुद्ध पैशाच्या अफरातफरीचा (मनी लाँडरिंग) गुन्हा दाखल करून घेतला आहे.
ईडीने काढलेल्या पत्रकानुसार कालरा विरूद्ध दिल्ली पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे हा गुन्हा दाखल करून घेतला आहे.
दरम्यान बुधवारी दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने दोन फोन ताब्यात घेतले आहेत. दिल्ली पोलिसांनी हे फोन अवैधरित्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या संदर्भात ताब्यात घेतले आहेत. हे फोन तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे अधिक तपासणीसाठी दिले आहेत.
दिल्लीच्या न्यायालयाने १७ मे रोजी कालराला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा:
ममतांनीच जिल्हाधिकाऱ्यांना बोलू दिलं नाही
२६/११च्या हल्ल्याला चोख जवाब देणारा जवान गमावला
भारतीय महिला संघ खेळणार पहिली पिंक बॉल टेस्ट
रुग्णाच्या मृत्यनंतरही ३ दिवस उपचार सुरु, नांदेडमधील धक्कादायक प्रकार
दिल्ली पोलिसांनी कालराच्या विरूद्ध फसवणुक, सार्वजनिक आज्ञेचा भंग, गुन्हेगारी कट आणि अत्यावश्यक वस्तुंचा कायदा १९५५ मधील विविध तरतुदींच्या आधारे अवैधरित्या साठवणूक केलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पकडल्यानंतर गुन्हा दाखल केला होता.
कालरासोबत दिल्ली पोलिसांनी मॅट्रिक्स सेल्युलर सर्विस लि. कंपनीचे सीईओ गौरव खन्ना (४७) याला देखील अटक केली आहे. ही सर्व उपकरणे आयात करणाऱ्या कंपन्यांमध्ये खन्ना यांच्या कंपनीचा देखील समावेश होता.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅट्रिक्स सेल्युलर या कंपनीला ६५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळाले होते, त्यापैकी ५२४ परत मिळवण्यात आले आहेत. हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर चीनवरून आणण्यात आले होते आणि ऑनलाईन पद्धतीने त्यांची विक्री करण्यात येत होती. दिल्लीच्या भागात यांची सुमारे २० हजार रुपयांना विक्री केली जात होती. ही त्यांच्या वास्तव किंमतीपेक्षा ४-५ पट अधिक आहे.