26 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरक्राईमनामाबॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी प्रेयसीने त्याच्या मुलाचा घेतला जीव !

बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी प्रेयसीने त्याच्या मुलाचा घेतला जीव !

बेडमध्ये लपवून ठेवला मृतदेह

Google News Follow

Related

लग्नाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी तरुणीने त्याच्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना दिल्ली येथे घडली.याबाबत कोणाला कळू नये म्हणून तरुणीने मुलाचा मृतदेह बॉयफ्रेंडच्याच घरातील बेडमध्ये लपवून ठेवला.मुलाचा मृतदेह घरातल्याच बेडमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी पूजा आणि बॉयफ्रेंड जितेंद्र हे दोघे २०१९ पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते.जितेंद्रने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करण्याचे वचन पुजाला देत होता.परंतु २०२२ साली जितेंद्र पूजाला सोडून आपल्या पत्नीकडे परतला आणि पत्नी आणि मुलासोबत राहायला लागला. या सगळ्या प्रकारानंतर पूजा चिडली होती. जितेंद्रचा राग तिच्या मनात होता. पूजा आणि जितेंद्रच्या नात्यामध्ये त्याचा मुलगा बिट्टू येत असल्याने जितेंद्र लग्नाला विरोध करत आहे असे पूजाला वाटत होते. त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी पुजाने टोकाचे पाऊल उचलत जितेंद्रच्या मुलाची गळा दाबून हत्या केली. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी २४ वर्षीय पूजाला अटक केली आहे.

हे ही वाचा:

केंद्र सरकारने ठरवले टॉमेटो विकायचे ५० रुपये किलो दराने!

अजित पवारांसमोरच कार्यकर्त्यांकडून गोंधळ !

हरियाणातील नूह हिंसाचारप्रकरणी गोरक्षक बिट्टू बजरंगीला अटक !

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे कार्य करू!

दिल्लीतील इंद्रपुरी परिसरात जितेंद्र राहत होता. एका मित्राच्या मदतीने पूजाने जितेंद्रच्या घराचा पत्ता मिळवला. त्यानंतर पूजा १० ऑगस्ट रोजी जितेंद्रच्या घरी पोहचली.घराचा दरवाजा उघडा असल्याचे तिने पाहिले आणि घरात शिरकाव केला. घरात जितेंद्रचा मुलगा सोडून कोणीच नसल्याचे पूजाच्या निदर्शनास आले. जितेंद्रचा ११ वर्षांचा मुलगा दिव्यांश (बिट्टू) हा बेडवर झोपला होता. दोघांच्या नात्यात मुलगा दिव्यांश अडसर येत असल्याने संधी साधत पूजाने दिव्यांशचा गळा आवळून त्याची हत्या केली. एवढेच नाहीतर कोणाला कळू नये म्हणून त्याचा मृतदेह त्याच्याच बेडमध्ये लपवून महिला पसार झाली.

त्यानंतर जितेंद्र यास आपल्या मुलाचा मृतदेह घरातल्याच बेडमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली.पोलिसांनी आरोपीचा तपास घेण्यासाठी जफगढ़-नागलोई रोड येथील रनहौला, निहाल विहार आणि रिशल गार्डन परिसरातील ३०० कॅमेराची मदत घेतली.त्यानंतर तीन दिवसांनी पूजाला बक्कारवाला परिसरातून अटक केली. अटक केल्यानंतर पुजाने हत्येची कबुली दिली.पोलिसांना दिलेल्या माहितीनुसर, बॉयफ्रेंडने केलेल्या फसवणुकीमुळे पूजाच्या मनात प्रचंड राग होता. त्यामुळे पूजाने रागाच्या भरात चिमुकल्या बिट्टूची हत्या केल्याचे कबूल केले, असे पोलिसांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा