दिल्लीच्या जहांगीरपुरीत अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर

दिल्लीच्या जहांगीरपुरीत अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर

हनुमान जयंतीच्या दिवशी राजधानी दिल्लीच्या जहांगीरपुरी येथे मिरवणुकीत दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर या संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण होते. दरम्यान दिल्ली पालिकेने या भागातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज, २० एप्रिल रोजी मोठ्या संख्येने जेसीबी, ट्रक्स आणि पोलीस या भागात जमा झाले.

आज सकाळपासून जहांगीरपुरी भागातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यास सुरुवात झाली आहे. या परिसरात अनेक पाकिस्तानी आणि बांगलादेशी राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून इथे अनधिकृत बांधकाम असून दोन ते तीन मजल्याची घरेही उभी केली गेली आहेत. या कारवाईत दुकाने, घरे अशा मालमत्तांवर हातोडा चालवला जात आहे. या कारवाई दरम्यान तणाव निर्माण होऊ शकतो म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

भारताची भूमिका कौतुकास्पद; रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव यांनी केले कौतुक

न्यायव्यवस्थेवर केलेली टीका संजय राऊतांना भोवणार

मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना म्हणजे बकासूर!

मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणारच!

दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीतील शोभायात्रेत शनिवारी दगडफेक झाल्यानंतर हिंसाचार झाला होता. या घटनेच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावरही दगडफेक करण्यात आली होती. या घटनेनंतर २१ जणांना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

Exit mobile version