दिल्लीमध्ये आईस्क्रीमच्या पैशाच्या वादावरून ग्राहकाने एका २३ वर्षीय आईस्क्रीम विक्रेत्याची हत्या केली आहे.बुधवारी( २४ एप्रिल) संध्याकाळी दिल्लीतील इंडिया गेटवर ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभात असे आईस्क्रीम विक्रेत्याचे नाव आहे.आईस्क्रीम विकत असताना पैसे देण्यावरून त्याचा ग्राहकाशी वाद झाला.दोघांमध्ये वाद वाढला आणि वादाचा शेवट हत्येने झाला.आरोपी ग्राहकाने आईस्क्रीम विक्रेत्यावर चाकूने वार करत घटनास्थळावरून पळ काढला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.प्रभातला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा:
भारतीयाच्या हृदयाने वाचवले पाकिस्तानच्या युवतीचे प्राण
अरविंद केजरीवाल यांनी घोटाळ्यादरम्यान १७३ फोन नष्ट केले
अमेठी, रायबरेली भेटीपूर्वी गांधी भावंडे अयोध्येला थांबण्याची शक्यता
ऋषभ पंतला सौरव गांगुलीची उभी राहून मानवंदना!
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात चौकशी केली.यानंतर पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्याचा शोध घेतला. आरोपीला अटक अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.