शिवसेनेचे आमदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानी प्रकरणी एक याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये ज्या आमदार खासदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला होता, त्या आमदार आणि खासदारांबद्दलचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच आमदार आदित्य ठाकरे यांनी आक्षेपार्ह अशी वक्तव्य केली होती म्हणून या याचिकेत तसे आरोप करण्यांत आले आहेत. याच याचिकेसंदर्भात मानहानी प्रकरणी न्यायालयाने हि याचिका दाखल करून घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत. याशिवाय न्यायालयाने या तिघाना या प्रकरणी त्यांना वैयक्तिक रित्या कोर्टात हजर राहून या आरोपांवरती स्वतः ची बाजू मांडण्यासाठी उपस्थित राहायला सांगितले आहे.
Delhi High Court issues summons to Uddhav Thackeray, his son Aditya Thackeray in a civil defamation suit filed by Eknath Shinde faction leader Rahul Ramesh Shewale. The Court has also issued summons to Sanjay Raut also in the suit. The next date of hearing is April 17. pic.twitter.com/0L0jN54jbV
— ANI (@ANI) March 28, 2023
दिल्ली उच्च न्यायालयाने याबाबत अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित केले आहेत. यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने सोशल मीडिया विरोधात नोटीस सुद्धा काढली आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया व्यासपीठावर जसे गुगल, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यासारख्या ठिकाणी संजय राऊत, उद्धव ठाकरे, आणि आदित्य ठाकरे यांनी आत्तापर्यंत शिंदे गटाच्या आमदारांवर अनेक चुकीची वक्तव्ये पोस्टरुपात अजूनपर्यंत ठेवलेली आहेत त्या पोस्ट का हटवल्या नसल्याचे याबाबत खुलासा करण्याचे न्यायालायने सांगितले आहे.
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ एप्रिलला दिल्ली उच्च न्यायालयात होणार आहे. या प्रकरणी संजय राऊत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे हे दिल्ली उच्च न्यायालयात हजार राहणार का? न्यायालयामध्ये आता ते काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा:
नाटू नाटू गाण्याचे प्रसिद्ध संगीतकार एम. एम. किरवाणींना झाला कोरोना
बोरिवलीत राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन
एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक पुन्हा चर्चेत
देशात चर्चा असलेल्या गुंड अतीक अहमदला आज काय शिक्षा होणार? फाशीची मागणी
काय आहे प्रकरण ?
शिंदे गटाला पक्षाचे धनुष्यबाणाचे चिन्ह आणि नाव देण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा सौदा झाला होता. न्याय विकत घेण्यासाठीचा हा मोठा सौदा सहा महिन्यामध्ये केला असल्याचा उल्लेख आणि ही डील असून हा विकत घेतलेला न्याय असल्याचा संजय राऊत यांनी आरोप केला होता.