दिल्ली अबकारी कर धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालयाने अर्थात ईडी आणि सीबीआयच्या सातत्याने धाडी चालू आहेत. ईडीने वाय एस आर काँग्रेसचे खासदार मागुंटा श्रीनिवसुलु रेड्डी यांचा मुलगा राघव मांगुटा याला अटक केली आहे. अशी माहिती ईडी अधिकाऱ्यांनी दिली आहे. बहुचर्चित अबकारी घॊटाळा प्रकरणात सीबीआय तसेच ईडीने ज्या काही तक्रारी दाखल केल्या आहेत, त्यामध्ये मुख्य आरोपी म्हणून उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे नाव घेण्यात येत आहे. सीबीआय कडून सिसोदियांनी सर्व पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला आहे.
Delhi excise policy case | Enforcement Directorate arrests YSRCP Lok Sabha MP Magunta Sreenivasulu Reddy – MSR’s son Raghav Magunta in the case.
— ANI (@ANI) February 11, 2023
आत्तापर्यंत ईडीने दिल्ली अबकारी कर घोटाळा यामध्ये सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली अबकारी कर घोटाळ्यात आत्तापर्यन्त ७६ कोटी ५४ लाख रुपयांची संपत्ती गोळा करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने मुंबई आणि दिल्लीतील घरे , सुमारे ५० गाड्या, रेस्टॉरंट्स, बँकांच्या ठेवी यांचा समावेश आहे. मद्य व्यावसायिक समीर महेंद्र आणि त्याची पत्नी , व्यापारी दिनेश अरोरा, आम आदमी पक्षाचे संपर्क विभाग प्रमुख विजय नायर, बाडी रिटेल या मद्य कंपनीचे संचालक अमित अरोरा, व्यापारी दिनेश अरोरा यांची विविध स्वरूपातील संपत्ती भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली ईडीने जप्त केली आहे.
हे ही वाचा:
काश्मीरमध्ये आढळला देशातील पहिला लिथियमचा साठा
करून गेले उद्धवराव आणि नाना पटोलेंचे नाव…
आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?
इस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले
राघव मागुंटा याला काल दहा फेब्रुवारीच्या संध्याकाळी मनी लौंड्रीन्ग प्रतिबंधक या कायद्याखाली अटक केली आहे. त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता असून ईडी न्यायालयीन कोठडी मागून घेणार आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे. रथ प्रोडकशन या जाहिरात कंपनीचा संचालक राजेश जोशी , आणि पंजाबचे माजी आमदार दीप मल्होत्रा यांचा मुलगा गौतम मल्होत्रा यां ना ईडीने अटक केली होती कालची हि तिसरी अटक आहे.