उबेर ट्रिपसाठी अतिरिक्त ११३ रुपये जास्त आकारल्याने पैसे परत मिळावे यासाठी प्रवाशाने गुगलवर सर्च करून उबेर कस्टमर केअर नंबरद्वारे मदत मागितली. मात्र, सूचीबद्ध केलेला क्रमांक बनावट निघाला आणि प्रवासी फसवणुकीला बळी पडला.फसवणुकीत प्रवाशाचे तब्बल पाच लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.
एफआयआरनुसार, एसजे एन्क्लेव्हमध्ये राहणारा पीडित प्रदीप चौधरी याने गुरुग्रामला जाण्यासाठी २०५ रुपये यादराने उबेर वरून कॅब बुक केली होती, परंतु उबरने त्याच्याकडून ३१८रुपये घेतले.
प्रदीप चौधरी यांनी तक्रारीत नोंदविले की, उबेरने ११३ रुपये जास्त आकारल्याने कॅब ड्रायव्हरला विचारले तेव्हा ड्रायव्हरने सांगितले की, कस्टमर केअरला कॉल करा म्हणजे तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील.त्यावरून मी गुगलवर सर्च करून ‘६२८९३३९०५६’ नंबर मिळविला व कॉल केला.परंतु ‘६२९४६१३२४०’ या नंबर वर तो रीडायरेक्ट झाला आणि नंतर ‘९८३२४५९९९३’ वर रीडायरेक्ट होऊन राकेश मिश्रा या व्यक्तीशी जोडला गेला.
हे ही वाचा:
सुटकेस मध्ये सापडलेल्या महिलेच्या हत्येची उकल,प्रियकराला अटक!
कांदिवली पूर्व विधानसभेत छठ पूजा उत्सव उत्साहात
पुण्यात कोयता गँगची दहशत; पाठलाग करत इमारतीच्या छतावर तरुणाची हत्या
भारत पराभूत झाला, पण ऑस्ट्रेलिया का जिंकली?
त्यानंतर त्या व्यक्तीने मला गुगल प्ले स्टोर वरून ‘रस्ट डेस्क अॅप’ डाउनलोड करण्यास सांगितले.त्यानंतर त्याने ‘पे टीअम’ उघडण्यास सांगितले आणि परतावा मिळण्यासाठी ‘आरएफएनडी’ ११२ डायल करण्यास सांगितले.माझा मोबाईल नंबर त्याने मागितल्यावर त्याला मी विचारले की, नंबर कशाला हवा तेव्हा त्याने सांगितले की, खाते पडताळणीसाठी नंबर हवा आहे.
त्यानंतर सुरवातीला ८३,७६० रुपये अतुल कुमार या व्यक्तीस पैसे ट्रान्सफर झाले.त्यानंतर चार लाख रुपये पुन्हा २०,०१२ रुपये, ४९,१०१ रुपये त्यासह इतर चार व्यवहार झाले.तीन व्यवहार पेटीमद्वारे आणि एक पीएनबी बँकेद्वारे झाल्याचे तक्रारदाराने सांगितले.या प्रकरणी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय दंड संहिता कलम ४२० आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ डी अंतर्गत आरोपीवर एफआयआर दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.