29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरक्राईमनामालैंगिक अत्याचार करत ब्लॅकमेल करणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थ्याने केले ठार

लैंगिक अत्याचार करत ब्लॅकमेल करणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थ्याने केले ठार

पेपर कटरने केले शिक्षकाच्या शरीरावर वार

Google News Follow

Related

दिल्लीतील जामिया नगर परिसरातील एका अल्पवयीन मुलाने २८ वर्षीय खासगी शिक्षकाची हत्या केल्याची घटना घडली. वारंवार लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेल करत असल्याने अल्पवयीन मुलाने त्याच्या खासगी शिक्षकाची हत्या केल्याचे तपासात आढळून आले आहे.या प्रकरणी अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बुधवारी जामिया नगरमधील एका अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली.अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरच्या एका खोलीचा दरवाजा उघडा असून त्यातून रक्त बाहेर येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती २८ वर्षीय असून वसीम असे त्याचे नाव आहे.३० ऑगस्ट रोजी वसीमचा मृतदेह सापडला. मृत वसीमच्या मानेवर खोलवर जखमा झाल्याचे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. जिथे मृतदेह सापडला ती मालमत्ता वसीमच्या वडिलांची होती आणि ती काही काळापासून रिकामी होती, असे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

जालना आंदोलनातून महाराष्ट्र अस्वस्थ करण्याचा प्रयत्न

आमदार नरेंद्र मेहताच्या मुलाच्या मोटारीचा सी लिंकवर भीषण अपघात

ऑगस्टमध्ये जीएसटी जमा होण्याचा नवा विक्रम

उदय कोटक यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या सीईओ पदाचा दिला राजीनामा

यानंतर जामिया नगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला.पोलिसांच्या निरीक्षणाच्या आधारे एका अल्पवयीनाची ओळख पटली.संबंधित १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर मुलाने शिक्षकाची हत्या केल्याचे कबुल केले.
पोलिसांनी दिलेल्या निवेदनानुसार वसीमने अल्पवयीन मुलावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले होते.तसेच मृत व्यक्तीने अल्पवयीन मुलाचा व्हिडीओ बनवला होता आणि तो व्हिडीओ सोशल मिडीयावर सोडण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत होता.३० ऑगस्ट रोजी वसीमने अल्पवयीन मुलाला सकाळी ११.३० च्या सुमारास लैंगिक अत्याचारासाठी बोलावले होते. त्यानंतर अल्पवयीन मुलगा जामिया नगरमधील अपार्टमेंटमध्ये पोहोचला.

मुलाने सोबत पेपर कटर आणला होता.वारंवार शिक्षकाकडून होणाऱ्या मारहाणीला तसेच लैंगिक अत्याचार करत ब्लॅकमेल करत असल्याने या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलाने आपल्या सोबत आणलेल्या पेपर कटरने खाजगी शिक्षकाच्या शरीरावर सपासप वार करत पळ काढला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी शोध घेत शनिवारी या अल्पवयीन मुलाला अटक केली.अनेक दिवसांपासून लैंगिक अत्याचार करत असल्याने शिक्षकाचा खून केल्याचे मुलाने सांगितले.तसेच मृत वसीमचा मोबाईल फोन, अल्पवयीन मुलाने घटनेच्या वेळी परिधान केलेले कपडे आणि बूट या अल्पवयीन मुलाकडून जप्त करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा