21 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरक्राईमनामासंजय बियाणींवर गोळ्या झाडणारा दीपक रांगा पोलिसांच्या ताब्यात

संजय बियाणींवर गोळ्या झाडणारा दीपक रांगा पोलिसांच्या ताब्यात

पंजाब येथील कारागृहातून घेतले ताब्यात

Google News Follow

Related

नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्या प्रकरणी प्रमुख शूटरला नांदेड पोलिसांनी पंजाब येथील कारागृहातून ताब्यात घेतले आहे. संजय बियाणी यांच्या शारदा नगर निवासस्थानासमोर दोघांनी गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केली होती. संजय बियाणी यांनी खंडणी न दिल्याने कुख्यात दहशदवादी हरविंदर सिंह उर्फ रांगा याने त्यांची हत्या घडवल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते.

 

 

५ एप्रिल २०२२ रोजी हे हत्याकांड घडले होते. संजय बियाणी यांच्यावर त्यांच्या घरासमोरच गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. बियाणी यांच्या मृत्यूनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात बिल्डर बियाणी यांचा मृत्यू झाल्याने गोळीबार करणाऱ्यांच्या तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष एसआयटी पथकाची निर्मिती केली होती.

हे ही वाचा:

G-20 नंतर पाकिस्तानी नागरीक आपल्याच सत्ताधाऱ्यांना देऊ लागले दोष

देवेगौडा येणार भाजपासोबत, लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती

साताऱ्यात आक्षेपार्ह पोस्टवरून राडा; जाळपोळ, दगडफेकीच्या घटना

ठाण्यात ४०व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; ६ कामगार ठार

एसआयटीने या प्रकरणात नांदेड मधून एकूण १७ जणांना अटक केली आहे. गोळ्या झाडणारे दोघे फरार होते. त्यापैकी दीपक रांगा याला गेल्या जानेवारी महिन्यात एनआयने नेपाळ बॉर्डरवरून अटक केली होती. त्याच्यावर पंजाब येथील मोहाली पोलीस मुख्याल्यावर ग्रेनेड हल्ला केल्याचा आरोप होता. शिवाय अनेक प्रकरणात तो पंजाब, हरियाणा, नांदेड पोलिसांना हवा होता. सध्या दीपक रांगा चंदीगड कारागृहात बंद होता. संजय बियाणी यांच्या हत्याकांडाच्या तपासासाठी नांदेड पोलिसानी दीपक रांगा याला ताब्यात घेतले. त्यानंतर न्यायालयाने त्याला २१ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा