मध्य प्रदेशच्या इंदूर येथील बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात रामनवमीनिमित्त आयोजित हवन कार्यक्रमादरम्यान एका विहिरीवरील छत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ३५ झाली आहे.
इंदूरचे जिल्हाधिकारी डॉ. इलयाराजा यांनी ही माहिती दिली. एकूण ३५ लोक मृत्युमुखी पडले असून एक बेपत्ता आहे तर १४ जणांचे प्राण वाचविण्यात आले आहेत. दोन जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. अजूनही काही लोक त्या विहिरीत अडकले आहेत का हे पाहण्यासाठी शोध कार्य सुरू आहे. गुरुवारी रात्री १२.३० वाजता हे शोधकार्य सुरू झाले आणि १८ तास ते सुरू होते. अजूनही हे शोधकार्य सुरू आहे. लष्कराचे ७५ लोक त्यासाठी तैनात झाले आहेत तर एनडीआरएफ व एसडीआरएफचे जवानही तिथे आहेत.
हे ही वाचा:
‘राहुल गांधींना राजकीय पटलावरून हटवण्याचे षडयंत्र काँग्रेसमध्येच सुरू!’
पंतप्रधानांनी पाहिले नवे संसदभवन… भव्य, सुसज्ज आणि नव्या रंगरूपात
‘सावरकर गौरव यात्रेला’ जळगावातून सुरुवात
राहुल यांचे शत्रू पवारांचे मित्र कसे?
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे तर जखमींना ५० हजारांची मदत देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिवराजसिंह यांच्याशी संपर्क साधून त्यांना या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात ट्विट करून आपल्या संवेदना कळविल्या होत्या. या दुर्घटनेत ज्यांचे आप्त मृत्युमुखी पडले आहेत किंवा जे जखमी आहेत त्यांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, त्यांच्या पाठी आपल्या संवेदना आहेत, असे पंतप्रधानांनी म्हटले होते.