तारिक फतेह यांना पून्हा जीवे मारण्याची धमकी

ट्विट शेअर करत दिली माहिती

तारिक फतेह यांना  पून्हा जीवे मारण्याची धमकी

पाकिस्तानी वंशीय  लेखक आणि पत्रकार तारिक फतेह यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तारिक हे समाज माध्यमांवर चांगलेच सक्रिय आहेत आता पुन्हा त्यांना शिरच्छेदाची धमकी देण्यात आली आहे. त्यांनी तसे ट्विट करत हि माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटचा फोटो दाखवत लिहिले आहे की, एक माणूस एक गट बनवत असून त्या गटाद्वारे ते माझा शिरच्छेद करण्याचा कट रचत आहेत. कृपया ट्विटरला या चे व्यासपीठ बनण्यापासून मी थांबवण्याचा प्रयन्त करत आहे. यामध्ये त्यांनी ट्विटर सपोर्टला टॅग केले आहे. पुढे त्यांनी असेही लिहिले आहे की, प्रिय ट्विटर  हा गट मला मारण्याचा कट रचत आहे.

कोण आहेत तारिक फतेह ?
तारिक हे कॅनडाचे नागरिक आणि पत्रकार असून पाकिस्तानी वंशाचे आहेत. अनेकदा सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ आणि माहिती ते देत असतात.समाज माध्यमांवर ते सक्रिय असल्यामुळे ते कट्टरता वाद्यांच्या निशाण्यावर आहेत. फतेह यांना धमकी देण्याअगोदरच एक दिवस आधी सलमान रश्दी यांच्यावर हल्ला करणाऱ्या तरुणाचा इराण देशात सन्मान केला आहे.

लेखक फतेह हे पाकिस्तान आणि इस्लाम विरोधी आवाज आपल्या लिखाणाच्या माध्यमातून किंवा समाजमाध्यमांवर व्यक्त होत उठवत असतात. त्यामुळेच पाकिस्तानी आणि इस्लामी लोक त्यांच्या विरोधात असल्यामुळे त्यांना आता हि धमकी मिळत असून याआधीसुद्धा त्यांना २०१७ साली उत्तर प्रदेशातील बरेली मधल्या एका मुस्लिम संघटनेकडून फतेह यांचा शिरच्छेद करणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. या अशा धमक्यांमुळे कट्टरतावादी जरी उत्साहात असले तरी त्यांचे काही चालणार नाही.

हे ही वाचा:

शिंदे आणि ठाकरे गट काय युक्तिवाद करणार ?

शिंदे आणि ठाकरे गट काय युक्तिवाद करणार ?

सोसायटीत खेळणाऱ्या लहानग्याला कुत्र्यांनी चावून मारले

खलिस्तानवाद्यांची भ्याड धमकी; इंदिरा गांधींबाबत जे झाले तसेच अमित शहांच्या बाबतीत होईल!

 

दरम्यान, सलमान रश्दी यांच्यावर हल्ला करणाऱ्याला इराण देशाने सन्मानित केले आहे. इराण च्या सरकारी दूरचित्रवाहिनीने वृत्त प्रसारित केल्यानुसार त्या हल्लेखोरांचा देशात सन्मान करून त्याला एक हजार चौरस मितर ची शेती देण्यात आली आहे.  मागील वर्षी अमेरिकेतील पश्चिम न्यूयॉर्क मध्ये एका मुसलमान युवकाने रश्दी यांच्यावर हल्ला केला होता त्यावेळेस त्यांचा एका हाताला दुखापत होऊन त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आहे. रश्दी यांच्यावर आरोप आहे कि त्यांनी महंमद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण आपल्या पुस्तकात केले असून इराण देशातील सर्वोच्च नेता अयातुल्लाह रुहोल्ला खामोनेई यांनी ३३ वर्षांपूर्वी सलमान रश्दीयांच्या विरुद्ध फतवा काढला होता. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

 

 

 

Exit mobile version