घाटकोपरमधून लव्ह जिहाद प्रकरण समोर आले आहे. १८ वर्षीय हिंदू तरुणीला नौशाद जामदार या तरुणाने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील फोटो काढून तिच्या आईला ब्लॅकमेल करत ५० हजार रुपये उकळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपी नौशादवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीटकरत ही माहिती दिली.
पिडीत तरुणीच्या आईच्या तक्रारीनुसार, ब्यूटी पार्लरचा कोर्स पूर्ण करून घरी बसलेल्या १८ वर्षीय मुलीला नौशाद जामदार या तरुणाने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून संपर्क सुरु केला. मला व माझ्या पतीच्या कानावर या गोष्टीची माहिती मिळताच, मुलीकडून नौशाद जामदार असे त्याचे नाव असल्याचे समजले. यानंतर मुलीला समजवण्यास सुरुवात केली. आई-वडील मुलीला समजावत असल्याची माहिती नौशादला समजली.
यानंतर नौशादने मे २०२३ ला माझ्याशी संपर्क साधून मला जागृतीनगर येथील मेट्रो स्टेशनच्या खाली रोडवर भेटण्यास बोलाविले. घटनास्थळी माझी आणि त्याची भेट झाली असता त्याने मला मुलीसोबत अफेअर सुरु असून मुलीच्या शरीराच्या खाजगी भागाचे फोटो मला दाखवले.
फोटो डीलेट करण्याची विनंती नौशादकडे केली. यावर त्याने ५० हजार रुपयाची मागणी केली. आम्ही गरीब आहोत एवढी मोठी रक्कम आम्हाला जमणार नाही असे सांगत फोटो डीलीट करण्यासाठी विनवणी केली. मात्र, तो पैशासाठी अडूनच बसला. अखेर इकडून तिकडून पैसे जमा केले आणि त्याच ठिकाणी दिले. नौशादने पैसे मोजून घेतले, मी त्याला फोटो डीलेट करण्यास सांगितले. मी नंतर फोटो डीलेट करतो आणि कोणाला काही सांगितले तर वाईट परिणाम होतील अशी धमकी देवून नौशाद निघून गेला. मला वाटले आता सर्व थांबेल पण त्यानंतरही नौशादने माझ्या मुलीचा पाठलाग करणे सोडले नाही, तसेच आम्हाला त्याच्यापासून धोका आहे, असे पिडीत तरुणीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे.
हे ही वाचा :
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी!
मणिपूरमधील संवेदनशील भागात व्यापक शोध मोहीम; ९४ चौक्या स्थापन
झारखंडमध्ये लिव्ह-इन पार्टनरची हत्या
मानवी तस्करी प्रकरणी एनआयएकडून सहा राज्यांमध्ये २२ ठिकाणी छापेमारी
घाटकोपर लव्ह जिहाद प्रकरण गुन्हा दाखल
17 वर्षांच्या हिंदू मुलीला फसवले, अश्लील फोटो काढले, ब्लॅकमेल करणाऱ्या नवशाद मेहबूब जमादारवर गुन्हा दाखल
Ghatkopar #LoveJIHAD Police registered against Naushad Jamdar for Blackmailing Hindu Girl of 17 year. Threatening to Viral her Videos pic.twitter.com/AGFHTFPuaA
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 28, 2024