प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्याकडे २० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. जर पैसे दिले नाही तर जीवे मारू असं धमकी देणाऱ्यानं म्हटलं आहे. मुकेश अंबानींना ईमेलमार्फत धमकी आल्याची माहिती मिळत आहे.
माहितीनुसार, २७ ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानींच्या ईमेल आयडीवर धमकीचा मेल पाठवला होता. या धमकीच्या ई-मेलमध्ये मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ईमेलमध्ये लिहिलं होतं की, “तुम्ही आम्हाला २० कोटी रुपये दिले नाही, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम नेमबाज आहेत,” अशा आशयचा हा मेल होता. मुकेश अंबानींच्या ईमेलवर आलेला मेल इंग्रजीत होता.
धमकीचा ईमेल मिळताच, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३८७ आणि ५०६ (२) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा:
ललित पाटील प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्याचा जबाब नोंदवला
पूर्वीचे सरकार मोबाईलसारखे हँग; २०१४ नंतर लोकांनी ‘आऊटडेटेड’ मोबाईल सोडले!
कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे ‘ते’ आठ माजी अधिकारी कोण?
मृत्युदंडाच्या शिक्षेपासून आठ भारतीय वाचू शकतील का?
अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही अनेकदा अँटिलियाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कारही जप्त करण्यात आली होती. मुकेश अंबानींची सुरक्षा लक्षात घेऊन त्यांना Z+ सुरक्षा देण्यात आली आहे, तर नीता अंबानींना Y+ दर्जाची सुरक्षा दिली आहे.