उत्तर प्रदेशातील पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फेसबुकच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली आहे. यात ‘सिर तन से जुदा’ करण्यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या धमकी प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी बरेलीतील आंवला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा फोटो लावून आक्षेपार्ह पद्धतीने एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. शिवाय यासोबत ‘सिर तन से जुदा’ चा ऑडिओ देखील लावण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असून समाजात आक्रोशाचे वातावरण आहे, असे या तक्रारीत म्हणण्यात आले आहे.
हे ही वाचा:
मांजरीला वाचवायला विहिरीत उतरलेल्या पाच जणांचा मृत्यू
भारतात यंदा मान्सून राहणार सामान्य
१० वर्षांत सेन्सेक्स २५ हजारांवरून ७५ हजारांवर!
धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी फैज रझा नावाच्या एका व्यक्तीविरुद्ध कलम ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात आहे. धमकी प्रकरणानंतर हिंदुत्ववादी संघटनांचे शेकडो कार्यकर्ते आंवला पोलीस ठाण्याच्या परिसर एकत्रित आले होते. त्यांनी एफआयआर नोंदवण्यासंदर्भात आणि आरोपीवर कारवाई करण्यासंदर्भात मागणी केली होती. यापूर्वीही धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना धमक्या मिळाल्या आहेत. त्यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून पोलीस त्यांच्या सुरक्षेबाबत सतर्क आहेत.