आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी

बांद्रा पोलिसांत तक्रार दाखल

आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई भाजपचे नेते आशिष शेलार यांना अज्ञात इसमाकडून पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी आली आहे.बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आशिष शेलार यांनी तक्रार केली  असून धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात पोलिसांनि गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात बांद्रा पोलिस पुढचा तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी फोन आला होता.गडकरी यांना एकूण तीन वेळा संबंधित आरोपीने फोन केला होता. त्यानंतर आता भाजपचे नेते आशिष शेलार यांना हे धमकीचे पत्र आले आहे. यामुळं भाजपच्या गोटात सध्या चिंता निर्माण झाली आहे. बांद्रा भाजपचे आमदार आशिष शेलार यांना निनावी पत्रामध्ये चौपाटीमध्ये फेकून देणार  , हातपाय तोडणार आणि कुटुंबीयांनाही संपवणार असा आशय या धमकीमध्ये आहे.शिंदे गटाबद्दलही वाईट शब्दांचा वापर केला गेला आहे.

आशिष शेलार यांच्या कार्यालयातील टपालपेटीत एक पत्र आलं होते ते धमकीचं पत्र होतं. त्यामुळे आशिष शेलार यांनी त्या पात्राची तक्रार बांद्रा पोलिसांत केली असून धमकी देणारा कोण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेल नाही.

पत्राचा आशय काय?
आशिष शेलार यांना आलेलं हे पत्र निनावि आहे. या पत्रात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे . त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करण्यात येतील आणि मुंबईतील चौपाटीमध्ये फेकून टाकणार. आणि कुटुंबीयांनाही संपवणार असा आशय या धमकीमध्ये आहे.

हे ही वाचा:

जाणून घ्या तुमच्या नेत्याला’

भाजपाचे मिशन मुसलमान २०२४

मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट दिले होते, पण…फडणवीस काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे भागम भागचा तिसरा भाग

बांद्रा पोलिसांत तक्रार
धमकीचे पत्र येताच आशिष शेलार यांनी बांद्रा पोलिसांत तक्रार केली. पत्र निनावी असल्यानं अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला पोलिस पुढचा तपास करत आहेत.

गेल्या वर्षी फोनवरून धमकी
याआधी आशिष शेलार यांना . गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात धमकीचा फोन आला होता. त्यावेळेस त्यांना फोनवरून अर्वाच्य शब्दात शिविगाळ करण्यात आली होती. शिवाय त्यांच्या कुटुंबीयांनाही त्यावेळी धमकावले होते. आशिष शेलार यांनी त्यावेळेस मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली होती.

Exit mobile version