नुकतेच लग्न झालेल्या कबड्डीपटूचा खून

नुकतेच लग्न झालेल्या कबड्डीपटूचा खून

मुंबईत आपल्या पुतण्याला वाचवण्यासाठी गेलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रभादेवी येथे ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेत राम सिंग (३२) याचा मृत्यू झाला आहे. राम सिंग हा एका विकासकाजवळ त्याचा सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. तर तो कबड्डीपटूही होता. राम सिंग यांचा पुतण्या राज आणि एका जिम प्रशिक्षकाच्या झालेल्या हाणामारीमध्ये राज याला वाचवायला गेलेल्या रामला आपला प्राण गमवावा लागला.

राम सिंग याचे तीन महिन्यापूर्वीच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याशी लग्न झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतण्या राज याने आपण संकटात असल्याचे राम यांना सांगितल्यावर राम घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळी दाखल होताच जिम प्रशिक्षक पाटील हा राज याला मारण्यासाठी सुरी घेऊन येत होता. त्यावेळी राम हे राजला वाचवण्यासाठी पुढे आले असता पाटील याने राम यांच्या पोटात सुरी खुपसून त्यांच्यावर हल्ला केला आणि राज याच्यावरही हल्ला केला. त्यानंतर पाटील याने घटनास्थळावरून पळ काढला.

यानंतर एका व्यक्तीने आपल्या बाईकवरून राम यांना केईएम रुग्णालयात दाखल केले. राम यांना गंभीर इजा झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू केले. मात्र, सुरी पोटात खुपसल्याने राम यांच्या यकृताला गंभीर इजा झाली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान राम यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी पाटील याला अटक करून त्याची चौकशी केली असता राज याने आपल्या १० वर्षाच्या मुलीसमोर हल्ला केला त्यामुळे अपमानास्पद वाटून त्याने रागाच्या भरात बचावासाठी आलेल्या राम सिंगवर हल्ला केला.

हे ही वाचा:

एक एक रुपया जमा करून त्याने घेतली ड्रीम बाईक

‘अडीच वर्षात केवळ अपमान होणार असेल तर उद्धव साहेबांनी विचार करायला हवा’

रमापती शास्त्री यांची प्रो-टेम स्पीकर म्हणून नियुक्ती!

“हाव डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत, देवाचो सोपूत घेता की…”

राम सिंग याचा भाऊ शंकर म्हणाला की, “राम सिंगने नुकतेच नवीन आयुष्य सुरू केले होते. त्यांच्या पत्नीला पोलिस क्वार्टरमध्ये घर देण्यात आले होते. त्यामुळे ते तिथे जाण्याचा विचार करत होते.” दादर पोलिसांनी सुरुवातीला खुनाचा प्रयत्न असा गुन्हा दाखल केला होता. मात्र, रामच्या मृत्यूनंतर त्यांनी खून केल्याप्रकरणी पाटील याची पोलिस कोठडीत रवानगी केली.

Exit mobile version