जम्मू- काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात गुरुवारी (१४ ऑक्टोबर) रात्री उशिरा दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान लष्कराचा आणखी एक अधिकारी आणि एक जवान शहीद झाले. पुंछ- राजौरी जंगलात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये लढाई सुरू होती. चार दिवसांपूर्वी देखील याच भागात कारवाई करताना लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते.
Jammu & Kashmir | One JCO and one soldier have lost their lives in a counter-terrorist operation in Mendhar sub-division of the Poonch district: Indian Army officials
— ANI (@ANI) October 15, 2021
जम्मू-पुंछ-राजौरी महामार्ग सध्या सुरू असलेल्या लष्करी कारवाईमुळे बंद करण्यात आला आहे. १० ऑक्टोबरला सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांसोबत ही चकमक सुरू आहे. पुंछ जिल्ह्यातील सुरनकोट भागात डेरा की गली (डीकेजी) मध्ये झालेल्या चकमकीदरम्यान लष्कराचा एक अधिकारी आणि इतर चार जवान शहीद झाले होते. याआधी लष्कराने म्हटले होते की, जेसीओसह दोन सैनिक चकमकीत गंभीर जखमी झाले आहेत. सध्या पूंछ जिल्ह्यातील जंगलामध्ये गुरुवारी रात्रीपासून दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून हे दहशतवादी लष्कराच्या टार्गेटवर होते. मात्र, जंगल आणि डोंगराळ भागाचा फायदा घेत दहशतवाद्यांनी लष्काराला चकमा दिला होता. आता गुरुवारी रात्री आमनेसामने आल्यानंतर दोन्ही बाजूने गोळीबार सुरू आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात गर्दी करण्याची मुभा?
महाराष्ट्रातील सरकारी बंद विरोधात उच्च न्यायलायत याचिका
… म्हणून मुंबई पोलीस समीर वानखेडेंना समन्स पाठवणार
भारत लसीकरणाच्या नव्या शिखराकडे!
मेंधर भागात झालेल्या या कारवाईत लष्कराने एक अधिकारी आणि जवान गमावले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला काश्मिरातील नागरिकांच्या हत्येला पुरस्कृत न करण्याचा इशारा दिला होता. दहशतवाद्यांना देणारा पाठिंबा न थांबवल्यास भारत अधिक सर्जिकल स्ट्राईक करेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. ‘सर्जिकल स्ट्राईकने हे सिद्ध केले आहे की आम्ही हल्ले सहन करत नाही. जर तुम्ही उल्लंघन केले तर आणखी बरेच हल्ले होतील,’ असा इशारा गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला दिला होता.