24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाभगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू

भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू

संजयच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेने कोणत्याही मुलाला शहीद भगतसिंग यांची भूमिका करण्यास सांगितलं नव्हतं, असं म्हटलं आहे.

Google News Follow

Related

कर्नाटकमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहीद भगतसिंग यांची भूमिका साकारताना गळफास लागून एका बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. हा मुलगा शाळेत होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी करत असताना हा अपघात झाला आहे. या घटनेचा पोलीस तपास करत असून, त्यांनी या घटनेविषयी माहिती दिली आहे.

संजय गौडा (१२) असं या मृत मुलाचे नाव असून, इयत्ता सातवीमध्ये तो शिकत होता. कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे हा मुलगा कुटुंबासोबत राहत होता. त्याच्या आई वडिलांचा घराशेजारीचं हॉटेल व्यवसाय आहे. रात्री काम झाल्यानंतर त्याची आई जेव्हा घरी आली तेव्हा घराचं दार बंद होते. तिने अनेकदा दार ठोठावलं पण काहीही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर शेजाऱ्यांनी खिडकीतून आत पाहिलं तेव्हा त्यांना या मुलाचा मृतदेह फॅनला लटकलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर त्याच्या आईवडिलांनी आपल्याकडच्या एका चावीने दार उघडलं आणि संजयला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय हा भगतसिंग यांना फाशी दिल्याचा प्रसंग शाळेच्या नाटकासाठी तयारी करत होता. नाटकाचा सराव करत असताना त्याने आपलं डोकं दोरमध्ये अडकवलं आणि खाटेवरून उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला. तसेच हा एक अपघात असून, कोणालाही जबाबदार धरत नसल्याचे मुलाच्या वडिलांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

मुंबई महापालिकेच्या कामांची होणार ‘कॅग’कडून चौकशी

मोरबी दुर्घटनेत १३२ लोकांचा मृत्यू, अनेकांना वाचवण्यात पथकाला यश

भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पण पाकिस्तानची गोची

विकेंडला मालवण हाऊसफुल्ल

मात्र, संजयच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेने कोणत्याही मुलाला शहीद भगतसिंग यांची भूमिका करण्यास सांगितलं नव्हतं, असं म्हटलं आहे. शाळेत वेशभूषा स्पर्धा होती या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांनी कर्नाटकच्या विकासासाठी प्रयत्न केलेल्या एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाच्या भूमिकेत या, असे शाळेने सांगितले होते. पण तरीही त्याने भगतसिंग यांची भूमिका का साकारली? असा प्रश्न शाळेच्या मुख्याध्यापकांना पडला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा