29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरक्राईमनामासमीर वानखेडेंना ८ कोटी देण्यात येणार होते... क्रूझ प्रकरणातील पंच साईलचा दावा

समीर वानखेडेंना ८ कोटी देण्यात येणार होते… क्रूझ प्रकरणातील पंच साईलचा दावा

Google News Follow

Related

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरील ड्रग्स छापेमारीप्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर नवनव्या खळबळजनक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. आता एनसीबीच्या एका पंचाने या सगळ्या प्रकरणासंदर्भात एक व्हीडिओ करून त्यात २५ कोटींचे ‘डील’ झाल्याचा आरोप केला आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना त्यात ८ कोटी देण्यात येणार होते, असा आरोपही त्याने केला आहे. या आरोपांचे खंडन समीर वानखेडे यांनी केल्याचे कळते. प्रभाकर साईल असे या पंचाचे नाव असून त्याने व्हीडिओच्या माध्यमातून हे दावे केले आहेत.

आर्यन खानला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्या प्रकरणात शाहरुख खानकडून २५ कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यात १८ कोटींपर्यंत हे ‘डील’ फायनल करून त्यातील ८ कोटी समीर वानखेडे यांना देण्याचे ठरल्याचे या पंचाने आपल्या व्हीडिओत म्हटले आहे.  त्यातील ८ कोटी रुपये वानखेडेंना देण्यात येणार होते आणि बाकीचे वाटून घेण्यात येणार होते, असा दावा साईलने केला आहे.

सदर प्रभाकर साईलने या आरोपांबाबतचे प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. तो आपल्या व्हीडिओत म्हणतो की, किरण गोसावी आणि सॅम डिसुझा यांच्या संभाषणात २५ कोटींच्या डीलचा उल्लेख होता. २५ कोटींचा बॉम्ब टाका. १८ कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचा साईलचा दावा आहे. आपण केपी गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे.

 

हे ही वाचा:

ICC Men’s T20 WC: आज कोणाला ‘मौका’?

‘भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर रोड तुरुंगात असतील’

विद्यार्थी पोहोचले पण परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक, प्रश्नपत्रिकाच नाहीत!

३४ मतदारांच्या निवडणुकीत शरद पवार-धनंजय शिंदे लढत

 

शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी, केपी गोसावी तसेच सॅम हे निळ्या रंगाच्या मर्सिडीजमध्ये एकत्र होते होते. या तिघांमध्ये काही चर्चा झाल्याचा दावाही साईलने केला आहे. त्याने असेही म्हटले की, एनसीबीच्या मुख्यालयात आपल्याला १० कोऱ्या कागदांवर स्वाक्षऱ्या करायला लावल्या. तसेच गोसावींच्या सांगण्यावरून एकेठिकाणाहून ५० लाखांची बॅग घेतल्याचे आणि ती सॅम डिसुझाकडे दिल्याचेही साईलने म्हटले आहे. मात्र त्यात ३८ लाखच होते असे सॅमने सांगितल्याचाही साईलचा दावा आहे.

या व्हीडिओमुळे आता क्रूझवरील छापेमारी प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. येत्या काळात आणखी कोणते नवनवे खुलासे समोर येतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा